Shah Rukh Khan | लेकीसाठी शाहरुख खान याने नाही तर, ‘या’ सेलिब्रिटीने उचललं मोठं पाऊल

किंग खान याची लेक सुहाना हिच्यासाठी पुढाकार घेणारा 'तो' कोण? शाहरुख खान याच्या मुलीचं बदलणार नशीब... सध्या सर्वत्र सुहाना खान हिचीच चर्चा...

Shah Rukh Khan | लेकीसाठी शाहरुख खान याने नाही तर, 'या' सेलिब्रिटीने उचललं मोठं पाऊल
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 7:54 AM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) कायम चाहत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. फक्त शाहरुखच नाही तर, अभिनेत्याची लेक सुहाना खान (suhana khan) देखील गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. सुहाना अद्याप अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करू शकली नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील सुहाना कायम चर्चेत असते. सुहाना लवकरच दिग्दर्शक झोया अख्तर दिग्दर्शित ‘द अर्चिस’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सुहाना सिनेमाबद्दल अनेक महत्त्वाचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते.

सुहाना आणि शाहरुख खान यांचे चाहते ‘द अर्चिस’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘द अर्चिस’ सिनेमानंतर सुहाना हिने आणखी एक सिनेमा साईन केला आहे. सुहाना हिच्या करियरसाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने पुढाकार घेतला आहे. ज्यामुळे किंग खानच्या लेकीच्या करियरमध्ये करण जोहर याचा मोलाचा वाटा असणार आहे. (Shah Rukh Khan daughter)

करण जोहर याने नुकताच सात वर्षांनंतर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पुन्हा पदार्पण केलं आहे. आता करण त्याच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याची माहिती मिळत आहे. रिपोर्टनुसार, करण त्याच्या आगामी सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहे. करण जोहर याचा आगामी सिनेमा कोणत्याही जुन्या सिनेमाचा सिक्वल किंवा रिमेक नसून नव्या कथेवर आधारलेला असणार असल्याची माहिती मिळत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्क्रिप्ट आणि सिनेमाच्या कथेवर अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही. सिनेमा सध्या पहिल्या टप्प्यावर आहे. मात्र या वर्षाच्या अखेरीस या सिनेमाचं चित्रीकरण सुरु होईल असं चित्र दिसत आहे. शाहरुख खान याच्या लेकीसाठी करण आता काय जादू करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सुहाना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, शाहरुखची लेक तिच्या रॉयल आयुष्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. सुहाना देखील सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुहाना कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता चाहते देखील सुहानाच्या आगामी सिनेमांच्या प्रतीक्षेत आहे.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.