Love Life | कोण आहे करण सिंग ग्रोव्हर याची पहिली पत्नी, घटस्फोटाबद्दल अभिनेत्रीच्या आई – वडिलांना नव्हतं माहिती
Love Life | पहिल्या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं, डेट केल्यानंतर घेतला लग्न करण्याचा निर्णय... पण एका वर्षात तुटलं करण सिंग ग्रोव्हर आणि श्रद्धा निगम यांचं लग्न... कोण आहे श्रद्धा निकम? सध्या का रंगत आहे अभिनेत्रीची चर्चा... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करण आणि श्रद्धा यांच्या नात्याची चर्चा..
मुंबई : 1 ऑक्टोबर 2023 | झगमगत्या विश्वात प्रेम – ब्रेकअप, लग्न – घटस्फोट समान्य आहे. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सेलिब्रिटींनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर काही दिवस सुखाचा संसार केल्यानंतर अनेक सेलिब्रिटी जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सध्या अभिनेता करण सिंग ग्रोव्हर याची पहिली पत्नी श्रद्धा निगम हिच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगत आहे. एक काळ असा होता, जेव्हा श्रद्धा सिनेमा आणि मालिकांमध्ये वेग-वेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत होती. श्रद्धा निगम हे टेलिव्हिजन आणि सिने जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. सध्या सर्वत्र श्रद्धा निगम हिची चर्चा सुरु आहे..
श्रद्धा निगम हिने १९९७ साली प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. सिनेमात झळकण्यापूर्वी तिने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अनेक सिनेमांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या. २०० साली प्रदर्शित झालेल्या जोश या सिनेमाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आज अभिनेत्रीचा वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेवू.
श्रद्धा निगम हिने खासगी आयुष्य
इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना श्रद्धा आणि करण यांची ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये प्रेम बहरलं. त्यानंतर दोघांनी देखील लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण करण आणि श्रद्धा यांचं पहिलं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या एका वर्षात दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सतत वाद होत असल्यामुळे दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेत स्वतःचे मार्ग वेगळे केले.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि करण यांचं घटस्फोट होत आहे, याची माहिती अभिनेत्रीच्या कुटुंबियांना नव्हती. अभिनेत्रीने कुटुंबियांना काहीही सांगितलं नव्हतं. करण याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर श्रद्धा हिच्या आयुष्यात मयंक आनंद याची एन्ट्री झाली. त्यानंतर २०१२ मध्ये श्रद्धा आणि आनंद यांनी लग्न केलं. आज अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यात आनंदी आहे.
तर करण सिंग ग्रोव्हर याने दुसरं लग्न टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जेनिफर विंगेट हिच्यासोबत लग्न केलं. दोघांचं नातं देखील अधिक काळ टिकलं नाही. दुसरं लग्न देखील अपयशी ठरल्यानंतर अभिनेत्याने अभिनेत्री बिपाशा बासू हिच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
करण आणि बिपाशी यांना एक मुलगी दोखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव देवी असं आहे. अभिनेत्री बिपाशा कायम लेक आणि पती करण याच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.