अखेर ‘तो’ दिवस आलाच…, करीना-करिश्मा यांचं तब्बल ३५ वर्षांनंतर एक स्वप्न पूर्ण

बॉलिवूडमध्ये राज्य करणाऱ्या कपूर सिस्टर्स यांना देखील करावी लागली एका गोष्टीची प्रतीक्षा; करीना-करिश्मा यांचं असं कोणतं स्वप्न होतं, जे पूर्ण होण्यासाठी लागले तब्बल ३५ वर्ष...

अखेर 'तो' दिवस आलाच..., करीना-करिश्मा यांचं तब्बल ३५  वर्षांनंतर एक स्वप्न पूर्ण
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 10:29 AM

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेत्री करिश्मा कपूर कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. दोघी बहिणी त्यांच्या आयुष्यात व्यस्त असल्या तरी अनेक महत्त्वाच्या वेळी एकत्र येतात. बॉलिवूडमधील कपूर सिस्टर्सची जोडी प्रचंड प्रसिद्ध आहे. आता देखील एका खास कारणासाठी कपूर सिस्टर्स चर्चेत आल्या आहे. कपूर सिस्टर्स यांचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. करीना-करिश्मा याचं हे स्वप्न एक दोन नाही तर, तब्बल ३५ वर्षांनंतर पूर्ण झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून करीना-करिश्मा यांचे आई – वडील एकमेकांपासून वेगळे राहतात. पण आता दोघांनी अखेर ३५ वर्षांनंतर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सर्वत्र कपूर कुटुंबाची चर्चा रंगत आहे.

चाहत्यांना देखील कपूर कुटुंबाला एकत्र पाहायला प्रचंड आवडतं. कपूर कुटुंबाची होळी आणि ख्रिसमस पार्टी चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहेत. या आनंदाच्या क्षणी कपूर कुटुंबाला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अशात करीना-करिश्मा यांच्या खासगी आयुष्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. लोलो – बेबो यांचे आई – वडील म्हणजे बबीता आणि रणधीर कपूर यांनी पून्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

मिळालेल्या माहितीनुसार, करीना-करिश्मा यांचे आई – वडील पुन्हा एकत्र आले आहेत. रिपोर्टनुसार, बबीता बांद्रा याठिकाणी असलेल्या पती रणधीर यांच्या घरी राहायला गेल्या आहेत. आई – वडीलांना पुन्हा तब्बल ३५ वर्षांनंतर एकत्र पाहून दोघी मुली आनंदी झाल्या आहेत. सात महिन्यांपूर्वी बबीता आणि रणधीर एकत्र आल्याची चर्चा रंगत आहे. सध्या कपूर कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.

गेल्या अनेक वर्षांपू्र्वी बबीता यांनी दोन्ही मुलींसोबत रणधीर यांच्या बंगला सोडून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बबीता दोन्ही मुलींसोबत लोखंडवाला येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. पण अद्याप रणधीर आणि बबीता यांनी घटस्फोट घेतलेला नाही. रणधीर यांचा स्वभाव आवडत नसल्यामुळे बबीता यांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. पण आता दोघे ३५ वर्षांनंतर पून्हा एकत्र आले आहेत.

करीना आणि करिश्मा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, दोघी बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र करिश्माच्या नावाची चर्चा असायची. पण आता करिश्मा बॉलिवूडपासून दूर आहे. पण करीना आजही मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करत असते.

सोशल मीडियावर देखील दोघांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. करीनाना सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये करीना आणि करिश्मा त्यांच्या आई – वडिलांसोबत दिसत आहेत. सध्या कपूर कुटुंबाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.