Kareena Kapoor : इतक्या रुपयांत करीना कपूर – शाहीद कपूर यांचा MMS लीक; तुम्हाला विश्वासच बसणार नाही
Kareena Kapoor : शाहीद कपूर - करीना कपूर यांचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्यासाठी 'त्या' तिघांना मिळाले इकते रुपये, अभिनेता अखेर व्यक्त झालाच... आज शाहीद - करीना त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत, पण एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त दोघांच्या नात्याची चर्चा सुरु होती.
मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर दोघे त्यांच्या खासगी आयुष्यात आनंदी आहेत. सोशल मीडियावर देखील दोघांचे त्यांच्या कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. जुन्या गोष्टी विसरुन करीना – शाहीद त्यांच्या आयुष्यात फार पुढे आले आहेत. पण एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त करीना – शाहीद यांच्या नात्याची चर्चा सुरु होती. फक्त चाहतेच नाही तर, बॉलिवूडमध्ये देखील करीना – शाहीद यांच्या रिलेशनशिपबद्दल सर्वांना कळलं होतं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. त्यांच्या नात्यातील धक्कादायक गोष्ट म्हणजे, करीना – शाहीद रिलेशनशिपमध्ये असताना त्यांचा एक MMS इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती.
शाहीद – करीना यांचा MMS कोणी व्हायरल केला आणि त्यासाठी त्यांना किती पैसे मिळाले? याबद्दल मोठी माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, व्हिडीओ तीन मुलांमुळे लीक झाला होता. तीन मुलांनी एका क्लबमध्ये ५५० रुपयांमध्ये शाहीद आणि करीना यांचा व्हिडीओ लीक केला होता.
MMS लीक झाल्यानंतर २०२३ मध्ये शाहीद कपूर याने मोठं वक्तव्य केलं होतं. ‘व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर माझं आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होतं.’ असं शाहीद कपूर म्हणाला होता. आता शाहीद त्याच्या खाजगी आयुष्यात आनंदी आहे. पत्नी मीरा आणि दोन मुलांसोबत अभिनेता वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. मीरा कायम सोशल मीडियावर दोन मुलं आणि पतीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
शाहीद कपूर याची पत्नी अभिनेत्री नसली तरी तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी मीरा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. एवढंच नाही तर, मीरा आणि शाहीद यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात येतं.
करीना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, २०१२ मध्ये करीना कपूर हिने बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं. सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांना दोन मुलं आहेत. तैमूर अली खान आणि जहांगीर अली खान अशी दोघांच्या मुलांची नावे आहेत. तैमूर आणि जेह यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तैमूर आणि जेह सेलिब्रिटी किड्स म्हणून प्रसिद्ध आहेत..
करीना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर,अभिनेत्री गेल्या दोन दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्रीच्या चाहत्यांच्या संख्या देखील फार मोठी आहे. आजही चाहते करीना हिच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात.