करीना कपूरचं साजिद अलीसोबत झालं होतं लग्न, नक्की काय आहे सत्य?

Kareena Kapoor Khan: कोण आहे साजिद अली? ज्याच्यासोबत झालं होत करीना कपूर हिचं लग्न, सत्य समोर आल्यानंतर चाहत्यांना देखील बसला धक्का... करीना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे असते चर्चेत...

करीना कपूरचं साजिद अलीसोबत झालं होतं लग्न, नक्की काय आहे सत्य?
करीना कपूर खान
Follow us
| Updated on: Oct 19, 2024 | 12:05 PM

Kareena Kapoor Khan Marriage: अभिनेत्री करीना कपूर कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत करीना हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. पण अभिनेत्रीने जेव्हा अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा करीनाला ट्रोल देखील करण्यात आलं. शिवाय अनेकांनी त्याचं लग्न झालेलं आणि तो 2 मुलांचा बाप आहे… असं सांगत करीना लग्न करू नकोस असा सल्ला दिला. पण तेव्हा करीनाने तिच्या मनाचं ऐकलं आणि सैफसोबत लग्न केलं.

सांगायचं झालं तर, करीना कपूर आणि सैफ अली खान यांच्या लग्नाला अनेक वर्ष झाली आहे. दोघांना दोन मुलं देखील आहेत. पण फार कमी लोकांना एक सत्य माहिती आहे. करीना हिचं लग्न साजिद अली नावाच्या एका व्यक्तीसोबत झालं. रिपोर्टनुसार, सैफ – करीना यांच्या लग्नाच्या कागदपत्रांवर अभिनेत्याचं नाव साजिद अली खान असं लिहिण्यात आलं.

ज्या कागदपत्रांवर दघांनी सही केली, त्यावर सैफने साजिद अली खानच्या नावाने सही केली. अभिनेत्याचं खरं नाव साजी अली असेल आणि त्याचं टोपन नाव सैफ अली खान असं असेल… असं देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या वेळा जे कागदपत्र देण्यात आले होते त्यामध्ये देखील अभिनेत्याचं नाव साजीद अली असं होतं.

सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर करीना स्वतःच्या नावापुढे ‘खान’ नाव लावते. ज्यामुळे देखील अभिनेत्रीला ट्रोल करण्यात आलं.

करीना कपूर हिच्यासोबत सैफ याचं दुसरं लग्न आहे. अभिनेत्याचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत झालं होतं. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अमृता हिच्यासोबत घटस्फोटाच्या अनेक वर्षांनंतर करीनाच्या आयुष्यात सैफची एन्ट्री झाली आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

लग्नानंतर सैफ आणि करीना आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबाचे फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. करीना – सैफ यांच्या मोठ्या मुलाचं नाव तैमुर अली खान तर लहान मुलाचं नाव जेह अली खान असं आहे. अभिनेत्री कायम पती आणि कुटुंबासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.