AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | वडिलांचा जीव वाचण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासमोर ढसा-ढसा रडली करीना कपूर

वडिलांचा जीव वाचवण्यासाठी ढसा-ढसा रडली अभिनेत्री करीना कपूर; अमिताभ बच्चन यांना बेबोने केली विनंती त्यानंतर...

Kareena Kapoor | वडिलांचा जीव वाचण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासमोर ढसा-ढसा रडली करीना कपूर
| Updated on: May 03, 2023 | 3:27 PM
Share

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. कपूर कुटुंबाची लेक कायम तिच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते. आज करीना बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर बेबोने कधीही मागे वळून पाहिलं नाही. करीनाने तिच्या अभिनय कौशल्याने अनेक सेलिब्रिटींसह चाहत्यांचं देखील मन जिंकून घेतलं. करीनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आज बॉलिवूडवर राज्य करणारी करीना एक दिवस वडिलांचे प्राण वाचविण्यासाठी ढसा-ढसा रडत होती. ही गोष्ट महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवली. तर आज जाणून घेवू पूर्ण प्रकरण नक्की आहे तरी काय…

सध्या ज्या गोष्टीची चर्चा रंगत आहे, तो किस्सा आहे ‘पुकार’ सिनेमा दरम्यानचा. सिनेमात अभिनेते अमिताभ बच्चन आणि रणधीर कपूर मुख्य भूमिकेतून चाहत्यांच्या भेटीस आले. सिनेमाच्या शुटिंग सुरु असताना एकदा करीना वडील रणधीर कपूर यांच्यासोबत सिनेमाच्या सेटवर आली होती. सिनेमात एक सीन होता, ज्यामध्ये रणधीर कपूर यांना बिग बी प्रचंड मारतात.

अमिताभ बच्चन यांच्याकडून वडिलांना होणारी मारहाण पाहता अभिनेत्री पूर्णपणे घाबरली होती. एवढंच नाही तर करीना वडिलांना जखमी पाहून रडू देखील लागली. अमिताभ बच्चन किती वाईट आहेत, असं देखील अभिनेत्रीला वाटू लागलं. त्यानंतर करीना अमिताभ बच्चन यांच्या जवळ गेली आणि म्हणाली , ‘कृपया माझ्या वडिलांना मारू नका…’ करीनाची अवस्था पाहून सेट असलेला प्रत्येक जण हैराण होता.

करीनाची अवस्था पाहून अमिताभ बच्चन यांनी तिला शांत केलं आणि सांगितलं, ‘जे काही सुरु ते सर्व खोटं आहे. तुझ्या वडिलांच्या जखमा देखील खोट्या आहे..’ बिग बींनी समज घातल्यानंतर दोघांनी चांगली मैत्री झाली. करीना कपूर हिच्या आयुष्यातील हा किस्सा आजही तुफान चर्चेत आहे.

करीना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर अभिनेत्री पती सैफ अली खान आणि दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. करीना कायम सोशल मीडियावर सैफ आणि दोन मुलांसोबत फोटो पोस्ट करत असते. करीना आणि सैफ यांनी कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता, त्यांच्या भावनांना अधिक महत्त्व दिलं आणि लग्न बंधनात अडकले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.