भर रस्त्यावर करीना कपूर-सैफ अली खानचा लिप लॉक; व्हिडीओवर भडकले नेटकरी
अभिनेत्री करीना कपूर आणि तिचा पती सैफ अली खान यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोघं एकमेकांना किस करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.
अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांना बॉलिवूडमधील पॉवर कपल मानलं जातं. हे दोघं फिल्म इंडस्ट्रीतील मोठे सेलिब्रिटी असले तरी रोजच्या जीवनात त्यांना अत्यंत साध्या अंदाजात पाहिलं जातं. सैफला अनेकदा कुर्ता पायजमा अशा सर्वसामान्य पोशाखात पाहिलं गेलंय. नुकताच या दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सैफ आणि करीनाच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधलंय. त्यामागचं कारण म्हणजे सैफ आणि करीना यामध्ये एकमेकांना किस करताना दिसून येत आहेत. रविवारी पापाराझींनी या दोघांचा व्हिडीओ शूट केला. करीना आणि सैफ त्यांच्या घराबाहेर निघाले, तेव्हा सैफ पत्नीला सोडायला कारपर्यंत आला होता. करीनाला निरोप देताना त्याने तिला किस केलं. दोघांमधील हा खास क्षण पापाराझींनी त्यांच्या कॅमेरामध्ये टिपला.
सैफ-करीनाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होतोय. काहीजण या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तर काहींनी त्यांच्यावर टीकासुद्धा केली आहे. ‘कॅमेरासमोरच इतकं प्रेम दाखवायची काय गरज’, असं एकाने लिहिलं. तर ‘या सेलिब्रिटींमुळेच तरुणाईवर परिणाम होतोय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘घरात वेळ मिळत नाही का एकमेकांसाठी’, असाही खोचक सवाल एका युजरने केला आहे. सेलिब्रिटी पब्लिसिटीसाठी काहीही करतील, अशी टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
सैफ आणि करीना यांनी 2012 मध्ये लग्न केलं. त्यापूर्वी दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या दोघांना तैमुर आणि झैद ही दोन मुलं आहेत. सैफचं हे दुसरं लग्न असून करीना आणि त्याच्या वयात बरंच अंतर आहे. करीनाच्या चित्रपटांविषयी बोलायचं झाल्यास तिचा ‘क्रू’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. यानंतर ती ‘सिंघम अगेन’मध्ये झळकणार आहे. तर सैफ अली खान ‘आदिपुरुष’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये त्याने रावणाची भूमिका साकारली होती. सध्या तो ‘देवरा: पार्ट वन’साठी शूटिंग करत आहे.
करीना नुकतीच तिच्या पुस्तकामुळेही चर्चेत आली आहे. तिचा आई होण्यापर्यंतचा प्रवास तिने ‘करीना कपूर खान्स प्रेग्नंसी बायबल: द अल्टिमेट मॅन्युअल फॉर मॉम्स टू बी’ या पुस्तकातून मांडला आहे. 2021 मध्ये करीनाचं हे पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्यावरून आता तिला कोर्टाने कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटिशीद्वारे कोर्टाने करीनाला तिच्या पुस्तकाच्या नावात ‘बायबल’ हा शब्द वापरण्यामागचं कारण स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.