AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“पैसा, प्रसिद्धी सर्वकाही बेकार, जर तुम्ही..”, करीना कपूर असं का म्हणाली?

अभिनेत्री करीना कपूर लवकरच 'क्रू' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. यानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत करीना मानसिक स्वास्थ्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

पैसा, प्रसिद्धी सर्वकाही बेकार, जर तुम्ही.., करीना कपूर असं का म्हणाली?
Kareena Kapoor Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 26, 2024 | 12:38 PM
Share

मुंबई : 26 जानेवारी 2024 | अभिनेत्री करीना कपूर सध्या तिच्या आगामी ‘क्रू’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शनिवारी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये करीनासोबत क्रिती सनॉन आणि तब्बू यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत करीना तिच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. कामाविषयी बोलतानाच तिने मानसिक स्वास्थ्यासारखा महत्त्वपूर्ण मुद्दा अधोरेखित केला. खुश राहण्यासाठी मानसिक स्वास्थ्य खूप महत्त्वाचं असतं, असं तिने म्हटलंय. आयुष्यात प्रसिद्धी, पैसा, करिअर या सर्व गोष्टी असूनही जर मानसिक शांतता नसेल तर त्या सर्वांचा काहीच अर्थ नाही, असंही ती म्हणाली.

“माझ्या मते माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यापैकी माझ्याकडे असलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी खुश आहे. माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वपूर्ण आहे. मी खुश यामुळे आहे कारण मानसिकदृष्ट्या मी स्थिर आहे. जर तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत आणि स्थिर नसाल तर प्रसिद्धी, पैसा, घर, कुटुंब सर्वकाही बेकार ठरतं. या सगळ्या गोष्टी त्यासमोर नगण्य ठरतात. म्हणून माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक स्वास्थ्य आहे”, असं करीनाने स्पष्ट केलं.

या मुलाखतीत करीना तिच्या खासगी आयुष्याविषयीही मोकळेपणे व्यक्त झाली. “जेव्हा सैफ त्याच्या कामात व्यग्र असतो, तेव्हा मी घरी आणि मुलांना वेळ देते. जेव्हा मी शूटिंगमध्ये व्यग्र असते, तेव्हा सैफ घरी राहतो आणि मुलांचा सांभाळ करतो. ही गोष्ट दोघांमध्ये खूप आधीपासून ठरलेली आहे. जून ते ऑगस्ट या महिन्यांत सैफ अजिबात काम करत नाही. या महिन्यात मुलगा तैमुरच्या शाळेलाही सुट्टी असते. त्यामुळे त्याला व्हेकेशनवर नेण्यासाठी आणि दोन्ही मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्यासाठी तो या ठराविक महिन्यांत काम करत नाही”, असं ती म्हणाली.

करीनाच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, तिने नुकतंच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं. ‘जाने जान’ या चित्रपटानंतर आता तिचा ‘क्रू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 29 मार्च रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.