Kareena Kapoor | ‘मी संन्यास घेणार, कारण…’, करीना कपूर हिच्या वक्तव्याने सर्वत्र खळबळ
Kareena Kapoor | अभिनेत्री करीना कपूर घेणार संन्यास? नक्की कारण काय? सध्या सर्वत्र फक्त आणि करीना कपूर हिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याची चर्चा...
मुंबई : 12 सप्टेंबर 2023 | अभिनेत्री करीना कपूर हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. करीना हिच्यानंतर बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेत्री बॉलिवूडवर राज्य करत आहे. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर करियर संपेल… असं करीना हिला अनेकांनी सांगितलं. पण लग्न आणि दोन मुलांना जन्म दिल्यानंतर देखील बॉलिवूडमध्ये असलेली बेबोची जागा कोणीही घेवू शकलं नाही. चाहत्याते आजही करीना कपूर हिच्या आगामा सिनेमांच्या प्रतीक्षेत असतात. करीना हिने वयाच्या १९ वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेल्या करीना कपूर हिने आता मोठं वक्तव्य केलं आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने बॉलिवूडमधून निवृत्ती घेईल असं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र करीना कपूर हिची चर्चा सुरु आहे.
अभिनेत्री म्हणाली, ‘सिनेमांसाठी असलेली माझी उत्सुकता मला नाहिशी करायची नाही. जर मला असं वाटलं की, माझी उत्सुकता कमी होत आहे, तेव्हा मी बॉलिवूडमधून संन्यास घेईल. कारण वयाच्या ४३ व्या वर्षी देखील माझी उत्सुकता कायम आहे. अभिनय करण्याची इच्छा संपली तर, मी निवृत्ती घेईल..’ असं अभिनेत्री म्हणाली.
पुढे करीना हिला कधी निवृत्ती घेणार असं विचारल्यानंतर अभिनेत्री म्हणाली, ‘कदाचित ८३ किंवा ९३ वयात मी निवृत्ती घेईल.. सध्या याबद्दल मला माहिती नाही. मला सध्या फक्त आणि फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करायचं आहे.’ असं देखील करीना कपूर म्हणाली.
करिना कपूर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नानंतर देखील करीना कपूर हिने अनेक हीट सिनेमांमध्ये काम केलं. आता अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. करीना लवकरच ‘जाने जान’ सिनेमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. अभिनेत्रीचा ‘जाने जान’ सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
करीना कपूर फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.