हनीमूनच्या रात्री पतीनेच लावली करिश्मा कपूर हिची बोली; अभिनेत्रीचं खासगी आयुष्य भयंकर

अभिनेत्री करिश्मा कपूरचं आयुष्य एका खुल्या पुस्तकासारखं; हनीमूनच्या पहिल्या रात्री पतीनेच लावली बोली, सासूकडून मारहाण आणि घटस्फोट... करिश्माचं खासगी आयुष्य सिनेमापेक्षा देखील भयंकर

हनीमूनच्या रात्री पतीनेच लावली करिश्मा कपूर हिची बोली; अभिनेत्रीचं खासगी आयुष्य भयंकर
हनीमूनच्या रात्री पतीनेच लावली करिश्मा कपूर हिची बोली; अभिनेत्रीचं खासगी आयुष्य भयंकर
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 9:40 AM

मुंबई : कपूर कुटुंबाची लेक आणि अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आज करिश्मा अभिनयात सक्रिय नसली तरी अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. करिश्मा सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. एक काळ होता जेव्हा करिश्मा हिने तिच्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं.

करिश्माचं प्रोफेशनल आयुष्य जेवढं यशस्वी, तेवढंच करिश्माला तिच्या खासगी अयुष्यात अपयशाचा सामना करावा लागला. करिश्मा कपूर लग्नानंतर चर्चेत आली, जेव्हा तिने पती संजय कपूरवर गंभीर आरोप केले. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांनी प्रेम विवाह केला.

लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा करिश्माने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले, तेव्हा अभिनेत्रीच्या कुटुंबियांसोबतच चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. करिश्माने दिलेल्या माहितीनुसार हनीमून पासूनच अभिनेत्रीवर अत्याचार झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, हनिमूनच्या रात्रीच संजय कपूरने करिश्माची बोली लावली होती. संजय कपूरने त्याच्या मित्रांसोबत करिश्मा कपूरसाठी बोली लावली होती. पण करिश्माने नकार दिल्यानंतर पती संजन याने अभिनेत्रीला मारहाण केली.

एवढंच नाही तर, फक्त संपत्तीसाठी लग्न केलं असल्याचं सांगत संजयने करिश्माला आर्थिक मदत देखील करत नव्हता. करिश्मा आणि संजय यांचं लग्न २००३ मध्ये झालं पण हे नातं फार काळ टिकलं नाही. एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर २०१४ मध्ये दोघे विभक्त झाले.

घटस्फोटानंतर करिश्मा कपूर तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगत आहे. तर संजय कपूर याने प्रिया सचदेव हिच्यासोबत लग्न केलं आहे. प्रिया संजयची तिसरी पत्नी आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.