karisma kapoor हिच्यासोबत सुनील शेट्टी याने असं काय केलं ज्यामुळे पोलीस बोलावण्याची आली वेळ!
सुनील शेट्टी याने अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्यासोबत केलेली 'ती' कृती अनेक वर्षांनंतर समोर... घबरलेल्या अभिनेत्रीवर पोलीस बोलावण्याची वेळ!

मुंबई : ‘राजा हिंदुस्तानी’, ‘दिल तो पागल है’, ‘हम साथ साथ है’, ‘राजा बाबू’, ‘जीगरी’, ‘हिरो नं १’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांच्या मनाात राज्य केलं. ९० च्या दशकात करिश्मा कपूर हिने अनेक एकापेक्षा एक सिनेमांमध्ये काम केलं. आज अभिनेत्री बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत राहते. करिश्मा कपूर हिने अभिनेता सलमान खान याच्यापासून अभिनेता सुनील शेट्टी याच्यासोबत देखील एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. पण सुनील शेट्टी याच्यासोबत काम करताना अभिनेत्रीवर अशी वेळ आली जेव्हा घाबरेलल्या करिश्मा हिने सर्वांना पोलिसांना बोलावण्यासाठी सांगितलं. खुद्द अभिनेत्रीने घडलेला प्रसंग सांगितला आहे.
काही दिवसांपूर्वी करिश्मा इंडियन आयडलाच्या स्टेजवर पोहोचली होती. यावेळी अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील अनेक मजेदार किस्से सांगितले. अभिनेत्री सुनील शेट्टी याच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. करिश्मा म्हणाली, ‘आम्ही सिनेमाचं शुटिंग करत होता. मी सेटवर दोन लोकांना मारामारी करताना पाहिलं. त्यांना पाहून मला प्रचंड भीती वाटली…’
पुढे अभिनेत्री म्हणाला, ‘दोघांना भांडताना पाहून मी खूप घाबरली होती. तेव्हा मी सेटवर उपस्थित असलेला लोकांना पोलिसांना बोलवायला सांगितलं होतं… त्यानंतर सुनील शेट्टी माझ्याजवळ आला आणि हा फक्त प्रँक असल्याचं त्याने मला सांगितलं…’ अभिनेत्रीने सांगितलेल्या किस्सा सध्या चाहत्यांमध्ये तुफान चर्चेत आहे.




करिश्मा कपूर हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगाययं झालं तर, करिश्माने अनेक अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली. अनेकांसोबत अभिनेत्रीचं नाव देखील जोडण्यात आलं. पण नातं लग्ना पर्यंत पोहोचू शकलं नाही. अभिने करिश्माने श्रीमंत उद्योजका संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नानंतर अभिनेत्री अनेक भयानक अनुभव आले.
करिश्मा आणि संजय यांचं लग्न २००३ मध्ये झालं पण हे नातं फार काळ टिकलं नाही. एकमेकांवर अनेक गंभीर आरोप केल्यानंतर २०१४ मध्ये दोघे विभक्त झाले. लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा करिश्माने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप लावले.
घटस्फोटानंतर अभिनेत्री दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. करिश्मा तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.