Karisma Kapoor | घटस्फोटाच्या बऱ्याच वर्षांनंतर एकत्र दिसले करिश्मा – संजय कपूर; दुसरी पत्नीही सोबत

करिश्माने (Karisma Kapoor) 2003 मध्ये व्यावसायिक संजय कपूरशी लग्न केलं. या दोघांना समायरा आणि कियान ही दोन मुलं आहेत. 2014 मध्ये करिश्मा आणि संजयने घटस्फोटासाठी अर्ज केला. 2016 मध्ये घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली.

Karisma Kapoor | घटस्फोटाच्या बऱ्याच वर्षांनंतर एकत्र दिसले करिश्मा - संजय कपूर; दुसरी पत्नीही सोबत
पूर्वाश्रमीच्या पतीसोबत दिसली करिश्मा कपूर; दुसऱ्या पत्नीलाही त्याच ठिकाणी पाहून नेटकरी अवाक्Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 4:35 PM

मुंबई : घटस्फोटानंतर पती आणि पत्नी यांच्यातील नातं जरी संपलं असलं तरी अनेकदा त्या दोघांना मुलांसाठी एकत्र यावं लागतं. बॉलिवूडमध्ये असे बरेच सेलिब्रिटी कपल आहेत, जे विभक्त झाल्यानंतरही त्यांच्या मुलांसाठी एकत्र येताना दिसतात. हृतिक रोशन आणि सुझान खान, मलायका अरोरा आणि अरबाज खान यांसारख्या जोडप्यांना अनेकदा घटस्फोटानंतरही मुलांसाठी एकत्र आल्याचं पहायला मिळालं. अभिनेत्री करिश्मा कपूरचा घटस्फोट इंडस्ट्रीत चर्चेचा विषय ठरला होता. मात्र विभक्त झाल्यानंतर ती संजय कपूरसोबत कधीच एकत्र दिसली नव्हती. मात्र आता बऱ्याच वर्षांनंतर करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांना एकत्र पाहिलं गेलंय. विशेष म्हणजे यावेळी संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवसुद्धा उपस्थित होती. त्यामुळे सोशल मीडियावर या तिघांचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

करिश्मा आणि संजय यांचा मुलगा कियानचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे तिघं एकत्र आले होते. या तिघांनी फॅमिली लंच करत मुलाचा वाढदिवस साजरा केला. पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये संजय कारमधून त्याचा मुलगा अजरियाससोबत बाहेर येताना दिसत आहे. तर त्याची पत्नी प्रिया ही दुसऱ्या कारने त्याठिकाणी पोहोचली. तर करिश्मा तिचा मुलगा कियानसोबत त्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली.

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. करिश्मा आणि संजय यांचा मुलगा कियान आता 13 वर्षांचा झाला आहे. करिश्माने सोशल मीडियावर कियान आणि तैमुरचा फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

पहा व्हिडीओ

दिल्लीतील बिझनेसमन संजय कपूरशी करिश्माने 2003 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना समायरा कपूर ही मुलगी आणि कियान राज कपूर हा मुलगा आहे. 2014 मध्ये करिश्मा आणि संजय यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यावेळी दोघांनी एकमेकांवर खंबीर आरोप केले होते. अखेर 2016 मध्ये दोघं विभक्त झाले.

घटस्फोटाच्या वर्षभरानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं. या दोघांना अझरियास हा मुलगा आहे. तर प्रियाचंही हे दुसरं लग्न आहे. पहिल्या लग्नापासून तिला सफिरा ही मुलगी आहे.

करिश्माच्या घटस्फोटानंतर ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत तिचे वडील रणधीर कपूर म्हणाले होते, “आम्ही कपूर आहोत आणि आम्हाला कोणच्याच पैशांमागे धावायची गरज नाही. आमच्याकडे पैसा आणि प्रतिभा या दोन्ही गोष्टी आहेत. संजय हा थर्ड क्लास व्यक्ती आहे. करिश्माचं त्याच्याशी लग्न व्हावं अशी माझी कधीच इच्छा नव्हती. त्याने त्याच्या पत्नीची कधीच काळजी घेतली नाही. तो दुसऱ्या महिलेसोबत राहत होता. तो कसा आहे हे संपूर्ण दिल्लीला माहित आहे.”

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.