Karisma Kapoor | श्रीमंत उद्योजकासोबत लग्न अपयशी; घटस्फोटानंतर ‘या’ व्यक्तीला करिश्मा करतेय डेट ?

करिश्मा कपूर हिच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री, 'या' व्यक्तीला करते डेट? घटस्फोटानंतर दोन मुलांचा 'सिंगल मदर' म्हणून अभिनेत्री करते सांभाळ... अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल सर्वत्र चर्चा..

Karisma Kapoor | श्रीमंत उद्योजकासोबत लग्न अपयशी; घटस्फोटानंतर 'या' व्यक्तीला करिश्मा करतेय डेट ?
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 10:42 AM

मुंबई : अभिनेत्री करिश्मा कपूर हिच्या खासगी आयुष्याबद्दल कायम चर्चा रंगलेल्या असतात. श्रीमंत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने दोन मुलांना जन्म दिला. पण अभिनेत्रींचं लग्न अपयशी ठरलं.. २००३ साली लग्न केल्यानंतर संजय आणि करिश्मा २०१६ मध्ये विभक्त झाले. घटस्फोटानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री झाल्याची चर्चा तुफान रंगत आहे. करिश्मा हिच्या लव्हलाईफबद्दल सांगायचं झालं तर, लग्नाआधी देखील अभिनेत्रीचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर करिश्मा हिचं नाव अभिनेता अजय देवगण याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांच्या नावाची तुफान चर्चा रंगली.

अजय आणि करिश्मा यांच्या नात्याची सुरुवात ‘जिगर’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान झाली. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. त्यानंतर करिश्माचं नाव अभिनेता सलमान खान याच्यासोबत जोडण्यात आलं. रिपोर्टनुसार, करिश्मा आणि सलमान रिलेशनशिपमध्ये देखील होते. पण दोघांनी त्यांच्या नात्याचा खुलासा कधीही केला नाही.. शिवाय दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे कोणते पुरावे देखील नाही…

फक्त अजय देवगण, सलमान खान नाही तर, करिश्मा कपूर हिचं नाव अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत देखील जोडण्यात आलं. जवळपास ५ वर्ष दोघे रिलेशनशिपमध्ये होते. पण दोघांचं लग्न होवू शकलं नाही. पण अभिषेक आणि करिश्मा यांच्या नात्याच्या चर्चा तर रंगल्याचं पण दोघांचे फोटो देखील समोर आले होते.

हे सुद्धा वाचा

अभिषेक बच्चन याच्यापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने २००३ साली श्रीमंत उद्योजक संजय कपूर यांच्यासोबत लग्न केलं… पण दोघांचं नात जास्त वर्ष टिकू शकलं नाही. नात्यामध्ये अनेक चढ-उतार आल्यानंतर दोघांनी २०१६ मध्ये घटस्फोट घेतला. संजय आणि करिश्मा यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या मुलीचं नाव समायरा आहे, तर मुलाचं नाव कियान आहे…

घटस्फोटा दरम्यान अभिनेत्रीने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले.. घटस्फोटानंतर २०१८ मध्ये करिश्माचं नाव संदीप तोषनीवाल यांच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं… पण सध्या संदीप आणि करिश्मा यांच्या नात्याबद्दल अधिक काही कळू शकलेलं नाही. पण सध्या करिश्मा तिच्या आगामी ‘ब्राऊन’, ‘मर्डर मुबारक’ वेब सीरिजमुळे चर्चेत आली आहे.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिची चर्चा रंगत आहे.

करिश्मा कपूर ९० च्या दशकात अभिनय जगतात अव्वल होती. गोविंदा, शाहरुख खान यांसारख्या स्टार्ससोबत देखील तिने स्क्रिन शेअर केली. ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’, ‘साजन चले ससुराल’ आणि ‘जीत’ यांसारख्या सिनेमांमधून करिश्माला स्टारडम मिळाले. आमिर खानसोबतचा ‘राजा हिंदुस्तानी’ आणि शाहरुख खानसोबतचा ‘दिल तो पागल है’ने करिश्माच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.