मुलगा आहे की बॉडीगार्ड…, करिश्मा कपूरच्या मुलाला पाहून चाहते अवाक्, व्हिडीओ पाहून म्हणाल…
Karisma Kapoor Son Kiaan: करिश्मा कपूर हिचा मुलगा कियानला पाहून नेटकरी थक्क, दिसतो प्रचंड हँडसम... त्याला पाहून नेटकरी म्हणाले, मुलगा आहे ती बॉडीगार्ड..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिश्मा कपूर हिच्या मुलाच्या लूकची चर्चा...
अभिनेत्री करिश्मा कपूर आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सध्या करिश्मा हिचा मुलगा कियान याच्यासोबत एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. इन्स्टंट बॉलीवूडच्या अधिकृत इन्स्टा पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये करिश्मा आणि कियान दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये करिश्माचा ग्लॅमरस लूक दिसत आहे. व्हिडीओमुळे कियान देखील लाईमलाईटमध्ये आला आहे.
व्हिडीओमध्ये कियान पांढऱ्या टी-शर्टवर खूपच हँडसम दिसत आहे. व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, ‘करिश्माचा मुलगा खूप डाउन टू अर्थ वाटतो’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कियान आता किती मोठा झाला आहे.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘मुलगा आहे की बॉडीगार्ड…’ सध्या सर्वत्र करिश्माच्या मुलाची चर्चा सुरु आहे.
View this post on Instagram
करिश्माचा मुलगा कियान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, कपूर कुटुंबातील सर्वत यशस्वी कलाकार आणि अभिनेते राज कपूर यांच्या नावावरून करिश्मा हिच्या मुलाचं नाव ठेवण्याच आलं. कियान राज कपूर असं अभिनेत्रीच्या मुलाचं नाव आहे. कियान याला अनेक आईसोबत स्पॉट करण्यात आलं आहे.
करिश्मा हिची लेक समायरा कपूर देखील फार बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. समायरा कपूर ही करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांनी मोठी मुलगी आहे. 2016 मध्ये संजय कपूर यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर करिश्मा हिने सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ केला. सोशल मीडियावर करिश्मा कायम मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.
करिश्मा हिने पहिला पती आणि सासरच्या मंडळींवर अनेक गंभीर आरोप केले होते. घटस्फोटानंतर संजय याने तिसरं लग्न केलं. पण मुलांसाठी करिश्मा हिने कधीच दुसरा संसार थाटण्याचा निर्णय घेतला नाही. करिश्मा दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे.
करिश्मा आता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर करिश्मा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.