‘दो दिल फिर मिल रहे हैं…’, कार्तिक आर्यन पोहोचला सारा अली खान हिच्या घरी, व्हिडीओ व्हायरल

Sara Ali Khan : ब्रेकअपनंतर पुन्हा एकत्र आलेत सारा - कार्तिक? सारा हिच्या घरी पोहोचला अभिनेता..., व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र चर्चांना उधाण... चाहत्यांमध्ये देखील सारा - कार्तिक यांच्या नात्याची चर्चा, व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल...

‘दो दिल फिर मिल रहे हैं…’, कार्तिक आर्यन पोहोचला सारा अली खान हिच्या घरी, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 10:55 AM

मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : सध्या बॉलिवूडमध्ये सर्वत्र दिवाली सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं. पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटी एकमेकांच्या घरी येताना दिसत आहेत. नुकताच अभिनेत्री सारा अली खान हिने देखील तिच्या घरी दिवळी पार्टीचं आयोजन केलं होतं. पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. पण सर्वांची नजर अभिनेता कार्तिक आर्यन याच्यावर येऊन थांबली. सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ब्रेकअपनंतर कार्तिक, एक्स – गर्लफ्रेंड सारा हिच्या घरी आल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

दिवाळी पार्टीसाठी कार्तिक ,सारा हिच्या घरी पोहोचला. पिवळ्या रंगचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाच्या पायजामा घालून अभिनेता दिवाळी पार्टीसाठी पोहोचला. कार्तिक याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. ‘दो दिल मिल रहे है…’ यांसारख्या अनेक कमेंट अभिनेत्याच्या व्हिडीओवर पाहायला मिळत आहेत.

हे सुद्धा वाचा

नुकताच, सारा अली खान अभिनेत्री अनन्या पांडे हिच्यासोबत दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये पोहोचली होती. शोमध्ये करण याने दोघींना त्यांच्या एक्सबद्दल विचारलं. तेव्हा सारा हिने मोठा खुलासा केला. ‘ब्रेकअपनंतर प्रचंड दुःख झालं होतं..’ असं अभिनेत्री म्हणाली.

ब्रेकअपनंतर सारा आणि कार्तिक अनेकदा एकमेकांसोबत स्पॉट झाले. ‘गदर 2’ सिनेमाच्या सक्सेस पार्टीमध्ये दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं. शिवाय दोघांनी एकमेकांना मिठी देखील मारली. एवढंच नाही तर, गणपती दर्शनासाठी देखील सारा कार्तीक याच्या घरी पोहोचली होती. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कार्तिक आणि सारा यांच्या रिलेशनशिपची चर्चा रंगली आहे.

गेल्या अनेक वर्षांपूर्वी सारा हिने कार्तिक आर्यन याला डेट करायला आवडेल… अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ‘लव्ह आज कल 2’ सिनेमाच्या माध्यमातून दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला, पण सारा – कार्तिक यांची जोडी हीट ठरली. दोघांच्या लव्हस्टोरीच्या चर्चा देखील सर्वत्र रंगू लागल्या होत्या. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. पण ब्रेकअपनंतर दोघे अनेकदा एकत्र दिसले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.