Urvashi Dholakia हिच्या कारला भीषण अपघात, कशी आहे आता अभिनेत्रीची प्रकृती?
'कसौटी जिंदगी की' फेम कोमोलिका म्हणजे उर्वशी ढोलकिया हिच्या कारला अपघात, अपघातानंतर अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल चाहत्यांकडून चिंता व्यक्त, तिला डॉक्टरांनी सांगितलं...
Urvashi Dholakia Accident : टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि बिग बॉस विजेती उर्वशी ढोलकिया (Urvashi Dholakia) हिच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली उर्वशी ढोलकिया हिच्या कारला अपघात झाला आहे. अभिनेत्रीच्या कारला एक बसने धडक दिली, ज्यामुळे अपघात झालेला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी घडली. अपघातानंतर चाहते अभिनेत्रीच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. अपघातानंतर उर्वशी ढोलकिया हिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या अपघातामुळे उर्वशी ढोलकिया चर्चेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री तिच्या कारमधून शुटिंगसाठी सेटच्या दिशेने जात होती. तेव्हा मागून भरधाव वेगात आलेल्या स्कूल बसने अभिनेत्रीच्या कारला धडक दिली. या धक्कादायक प्रकरणानंतर उर्वशी ढोलकिया हिने कोणतीही तक्रार केली नसल्याची माहिती समोर येत आहे. हा फक्त एक अपघात आहे. चाहत्यांना काळजी करण्याचं काही कारण नाही. डॉक्टरांनी काही दिवस बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे… अशी माहिती अभिनेत्रीने दिली आहे. (Urvashi Dholakia car Accident)
View this post on Instagram
नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत कारमध्ये अभिनेत्रीचा स्टाफ देखील होता. पण दिलासा देणारी गोष्टी कोणीही गंभीर जखमी नाही. अपघातामुळे चर्चेच आलेल्या उर्वशी ढोलकिया हिने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत कोमोलिका ही खलनायकाची भूमिका साकारत अभिनेत्रीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. त्यानंतर उर्वशी ‘नागिन’ मालिकेत अभिनेत्री झळकली.
उर्वशी ढोलकिया हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी लग्न केलं. त्यानंतर १७ व्य वर्षी उर्वशी हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. लग्नानंतर फक्त दोन वर्षात उर्वशी हिचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने दुसरं लग्न केलं नाही, किंवा कोणत्याही व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये राहिली नाही.
अभिनेत्रीने दोन मुलांसोबत आनंदाने आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. आता उर्वशी तिच्या दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगते. उर्वशी हिच्या दोन मुलांची नावं सागर आणि क्षितिज अशी आहेत. उर्वशी सिंगल म्हणून दोन्ही मुलांचा सांभाळ करते. उर्वशी कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
उर्वर्शीच्या चर्चा कायम रंगत असतात. पण अभिनेत्री सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. उर्वशी प्रचंड फिटनेस फ्रिक देखील आहे.