Katrina Kaif Love Life: विवाहित अभिनेता ते श्रीमंत उद्योजकाचा मुलगा; कतरिनाच्या अफेअर्सची लिस्ट थक्क करणारी

विवाहित अभिनेता ते श्रीमंत उद्योजकाचा मुलगा... विकी कौशल याच्यासोबत लग्न करण्याआधी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत होते कतरिनाचे 'प्रेमसंबंध'... सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

Katrina Kaif Love Life: विवाहित अभिनेता ते श्रीमंत उद्योजकाचा मुलगा; कतरिनाच्या अफेअर्सची लिस्ट थक्क करणारी
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 1:46 PM

मुंबई | 16 जुलै 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर झगमगत्या विश्वात एक वेगळी ओळख निर्माण केली. अशाच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री कतरिना कैफ. ‘मैंने प्‍यार क्‍यों किया’ सिनेमातून अभिनेत्रीचं नशीब चमकलं. त्यानंतर कतरिना हिने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज कतरिना बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कतरिना तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे तर कायम चर्चेत असते. पण तिचं खासगी आयुष्य देखील कायम चाहत्यांमध्ये चर्चेत असतं. २०२१ मध्ये कतरिनाने अभिनेता विकी कौशल याच्यासोबत लग्न केलं. पण विकी कौशल याच्यासोबत लग्न करण्याआधी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत कतरिनाचे ‘प्रेमसंबंध’ होते. आज कतरिनाच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेवू तिच्या प्रेम प्रकरणांबद्दल…

अभिनेता सलमान खान : जेव्हा कतरिना कैफ हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, तेव्हा सलमान खान याने अभिनेत्रीला आधार दिला होता. एकत्र काम करत असताना दोघांमध्ये प्रेम बहरलं. दोघांचं रिलेशनशिप ७ वर्षांचं होतं असं देखील म्हणतात. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. पण कतरिना आणि सलमान खान दोघांनी कधीही नात्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली नाही.

अभिनेता सिद्धार्थ माल्या : सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कतरिनाचं हिचं नाव उद्योजक विजय माल्या याचा मुलगा आणि अभिनेता सिद्धार्थ माल्या याच्यासोबत जोडलं जावू लागलं. एवढंच नाही तर, आयपीएलच्या अनेक सामान्यांमध्ये दोघे एकत्र दिसले. पण सिद्धार्थ याच्यासोबत असलेल्या नात्यावर देखील अभिनेत्री काहीही बोलली नाही.

अभिनेता रणबीर कपूर : कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांच्या नात्याबद्दल सर्वांना माहिती आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं होतं. दोघांचं नातं लग्नापर्यंत देखील पोहोचलं होतं. पण कपूर कुटुंबियांचा नकार असल्यामुळे रणबीर आणि कतरिना यांचं लग्न होवू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

अभिनेता अक्षय कुमार : विवाहित अक्षय कुमार याच्यासोबत देखील कतरिनाच्या नावाची चर्चा झाली. अनेक सिनेमांमध्ये काम केल्यानंतर दोघांच्या नावाची चर्चा रंगू लागली. दोघांच्या ऑनस्क्रिन जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण दोघांनी नात्यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.

अभिनेता विकी कौशल : अनेक ब्रेकअपनंतर अभिनेत्रीने विकी कौशल याच्यासोबत लग्न केलं. पण लग्नाआधी कधीही दोघांनी त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. २०२१ मध्ये जेव्हा दोघांनी लग्नाची घोषणा केली तेव्हा सर्वच चाहते थक्क झाले. आज कतरिना आणि विकी कौशल एकत्र वैवाहित आयुष्याचा आनंद घेत आहेत.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.