Katrina Kaif | लग्नाबद्दल नीतू कपूर यांच्या टोमण्यानंतर कतरिनाने जोडले हात; ‘नको असतानाही सल्ला..’

नीतू कपूर यांनी त्यांच्या पोस्टमधून अप्रत्यक्षपणे कतरिना कैफला टोमणा मारल्याची चर्चा सुरू असतानाच कतरिनाच्या आईने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांची ही पोस्ट म्हणजे जणू नीतू कपूर यांना दिलेलं अप्रत्यक्ष उत्तर होतं की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता.

Katrina Kaif | लग्नाबद्दल नीतू कपूर यांच्या टोमण्यानंतर कतरिनाने जोडले हात; 'नको असतानाही सल्ला..'
Katrina Kaif and Neetu KapoorImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 1:06 PM

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांच्या पोस्टवरून जोरदार चर्चा सुरू आहे. नीतू यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. मात्र या पोस्टमधून त्यांनी रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला टोमणा मारल्याचं म्हटलं जात होतं. ‘त्याने तुम्हाला 7 वर्षे डेट केलं म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो तुमच्याशी लग्न करेल. माझे काका 6 वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत’, असं या पोस्टमध्ये लिहिलं होतं. रणबीर आणि कतरिना जवळपास 7 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. म्हणून नीतू यांनी कतरिनाला हा टोमणा मारला, असं काही नेटकरी म्हणत होते. त्यानंतर कतरिनाच्या आईचीही पोस्ट चर्चेत आली होती. आता कतरिनाच्या एका कमेंटने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

प्रसिद्ध अमेरिकन मॉडेल बेला हदीदने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली होती. त्यावर कतरिनाने कमेंट केली आहे. बेलाची ही पोस्ट नको असलेल्या सल्ल्यांबद्दल आणि इतरांना वाईट बोलण्याबद्दल होती. ‘एखादी व्यक्ती मानसिक किंवा शारीरिकरित्या कोणत्या गोष्टींचा सामना करतेय हे आपल्याला कधी कळत नाही. मग ते आजार असो किंवा नैराश्य. जोपर्यंत तुम्ही त्याच परिस्थितीचा सामना करत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या दु:खाचा अंदाजसुद्धा लावू शकत नाही. त्यामुळे नको असलेले सल्ले, मतं, आक्रमकता यांऐवजी फक्त मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करा आणि दयाळू व्हा. जर एखाद्याला दुसऱ्या व्यक्तीबद्दल काही वाईट बोलायचं असेल तर स्वत:ला त्या संभाषणातून दूर करा’, अशी पोस्ट बेलाने लिहिली होती. बेलाच्या या पोस्टवर कतरिनाने हात जोडण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. कतरिनाच्या या कमेंटला अनेकांनी लाइक केलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Bella ? (@bellahadid)

कतरिनाच्या आईची पोस्ट

नीतू कपूर यांनी त्यांच्या पोस्टमधून अप्रत्यक्षपणे कतरिना कैफला टोमणा मारल्याची चर्चा सुरू असतानाच कतरिनाच्या आईने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यांची ही पोस्ट म्हणजे जणू नीतू कपूर यांना दिलेलं अप्रत्यक्ष उत्तर होतं की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला होता. ‘रखवालदारालाही सीईओप्रमाणेच आदराने वागवण्याची शिकवण मला लहानपणापासूनच मिळाली’, अशी ही पोस्ट होती. कतरिनाच्या आईची ही पोस्ट म्हणजे अप्रत्यक्षपणे नीतू कपूर यांना दिलेलं उत्तरच आहे, असा अंदाज नेटकरी वर्तवू लागले होते. मात्र ही पोस्ट कोणालाच उद्देशून नव्हती किंवा सोशल मीडियावर बोलल्या गेलेल्या कोणत्याही टिप्पणीला उद्देशून नव्हती, असं त्यांनी नंतर स्पष्ट केलं होतं.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.