व्हिडीओ रेकॉर्ड होत असल्याचं पाहताच कतरिनाने विकीला भररस्त्यात थांबवलं अन्..

कतरिना कैफ आणि विकी कौशल पुन्हा एकदा लंडनच्या रस्त्यावर एकमेकांच्या हातात हात घालून निवांत फिरताना दिसले. मात्र यावेळी कतरिनाला जेव्हा समजलं की त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड केला जातोय, तेव्हा लगेच तिने विकीला मागे खेचलं.

व्हिडीओ रेकॉर्ड होत असल्याचं पाहताच कतरिनाने विकीला भररस्त्यात थांबवलं अन्..
कतरिना कैफ, विकी कौशलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 3:06 PM

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल हे गेल्या काही दिवसांपासून लंडनमध्ये राहत आहेत. कतरिना गरोदर असल्याच्या चर्चा असून भारतात पापाराझींना टाळण्यासाठी ती लंडनमध्ये राहत असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर अद्याप कतरिना किंवा विकीकडून कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. मात्र आता त्या दोघांना लंडनमधील आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. या व्हिडीओमध्ये कतरिना आणि विकी एकमेकांचा हात धरून रस्ता ओलांडत असतात. अशातच कतरिनाची नजर कॅमेराकडे जाते आणि रस्त्याच्या मधेच ती विकीला थांबवत त्याला मागे खेचते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

काही दिवसांपूर्वी कतरिना आणि विकीचा लंडनमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर कतरिनाच्या प्रेग्नंसीच्या चर्चांना उधाण आलं होतं. या व्हिडीओमध्ये कतरिनाने जाडसर जॅकेट घातला होता, त्यामुळे तिचं पोट स्पष्ट दिसत नव्हतं. पण तिच्या चालण्यावरून नेटकऱ्यांनी अंदाज लावला होता की ती प्रेग्नंट असू शकते.

काही दिवसांपूर्वी विकीच्या वाढदिवशी कतरिनाने सोशल मीडियावर फक्त त्याचाच फोटो पोस्ट करत शुभेच्छा दिल्या होत्या. तिने स्वत:चा किंवा तिच्यासोबतचा कोणताच नवीन फोटो सोशल मीडियावर अपलोड न केल्याने प्रेग्नंसीच्या चर्चांमध्ये काहीतरी तथ्य असल्याचं म्हटलं गेलं. इतकंच नव्हे तर दोघांच्या जवळच्या व्यक्तीने ‘झूम’ या वेबसाइटला कतरिनाच्या प्रेग्नंसीबद्दल माहिती दिली होती.

हे सुद्धा वाचा

Katrina and Vicky spotted in London byu/skyisscary inBollyBlindsNGossip

“जर सर्वकाही व्यवस्थित घडलं तर कतरिना आणि विकी हे त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत युकेमध्येच करू शकतात”, असं त्यांनी म्हटलं होतं. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या दुसऱ्या बाळाला लंडनमध्येच जन्म दिला होता. कतरिना ही युकेमध्येच लहानाची मोठी झाली आणि लंडनमधील हँपस्टीड याठिकाणी तिचं स्वत:चं घरसुद्धा आहे. त्यामुळे लंडनमध्ये कतरिना तिच्या बाळाला जन्म देऊ शकते, असं म्हटलं गेलं होतं. मात्र नंतर तिच्या एजन्सीकडून या वृत्ताला फेटाळण्यात आलं होतं. “सर्व माध्यमांना विनंती करण्यात येते की तातडीने या चर्चा थांबवाव्यात”, असं ‘रेनड्रॉप मीडिया’ने स्पष्ट केलं होतं. कतरिना आणि विकीने 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. या लग्नाला बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोजके पाहुणे उपस्थित होते.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.