‘कतरिना इसे कैसे मिल गई’, Vicky Kaushal चा अनसीन व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते थक्क
Vicky Kaushal : कतरिना कैफ हिच्यासोबत लग्न करण्यापूर्वी विकी कसा होता... अभिनेत्याचा अनसीन व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते म्हणाले, 'कतरिना इसे कैसे मिल गई', व्हिडीओ सर्वत्र तुफान व्हायरल
मुंबई | 26 जानेवारी 2024 : अभिनेता विकी कौशल नुकताच ‘सॅम बहादूर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आला. विकी याने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे. आज विकी याला कोणाच्या ओळखीची गरज नाही. बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत विकी कौशल अव्वल स्थानी आहे. विकी कौशल याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. सध्या विकी याचा एक अनसीन व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
विकी याचा व्हायरल होत असलेला अनसीन व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. व्हिडीओ विकी याच्या एक्टिंग स्कूल दरम्यानचा असल्याचं सांगितलं जात आहे. विकी कौशल याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विकी एका दक्षिण भारतीय पात्राची भूमिका साकारत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ किशोर कपूर इन्स्टिट्यूट, मुंबई या त्याच्या ॲक्टिंग स्कूलच्या प्रोजेक्टसाठी बनवण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे. व्हिडीओमध्ये विकी तरुण दिसत आहे.
View this post on Instagram
विकी कौशल याच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. शिवाय व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘सर्व काही नशिबाचा खेळ आहे. परिश्रम, मेहनत प्रत्येक जण करतो. पण कतरिना कैफ असं कोणाला नाही भेटत…’
दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘विकी त्याच्या मेहनतीमुळे उच्च शिखरावर पोहोचला आहे..’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त विकी कौशल याच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे. विकी फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो.
विकी याने अनेक वर्ष कतरिना हिला डेट केल्यानंतर लग्न केलं. शाही थाटात विकी आणि कतरिना यांनी लग्न केलं. कतरिना आणि विकी एकमेकांसोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करत असतात. चाहत्यांना देखील दोघांची जोडी फार आवडते.
विकी कौशल याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘लव्ह एन्ड वॉर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी दिग्दर्शक संजय लिला भंसाळी यांच्यावर आहे.