ती एवढी हसली, एवढी हसली… अमिताभही तिला रोखू शकले नाहीत, उलट बिग बींना..

आपल्या ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी 'कौन बनेगा करोडपती' हा शो स्पर्धकांना देतो. सध्या या शोचा पंधरावा सिझन चांगलाच गाजतोय. या सिझनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये एका अशा स्पर्धकाची एण्ट्री झाली, जिला पाहून प्रेक्षकांसोबत बिग बींनाही हसू अनावर होतंय.

ती एवढी हसली, एवढी हसली... अमिताभही तिला रोखू शकले नाहीत, उलट बिग बींना..
KBC 15Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 02, 2023 | 10:26 AM

मुंबई : 2 डिसेंबर 2023 | ‘कौन बनेगा करोडपती 15’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो आहे. या शोमधील एका महिला स्पर्धकाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. केबीसीच्या एपिसोडमधील तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून त्यावर सूत्रसंचालक अमिताभ बच्चनसुद्धा व्यक्त झाले आहेत. या महिला स्पर्धकाचं नाव आहे अलोलिका भट्टाचार्जी. तिने केबीसीचा खेळ तर उत्तम खेळळाच, पण त्याशिवाय जेवढा वेळ ती हॉटसीटवर बसली, तेवढा वेळ तिने उपस्थितांसह बिग बींनाही खळखळून हसवलं. केबीसीच्या हॉटसीटपर्यंतचा तिचा प्रवास सांगताना अलोलिका स्वत:सुद्धा इतकी हसली की तिला पाहून बिग बींनाही हसू अनावर झालं.

बिग बी अलोलिकाला तिचा हॉटसीटपर्यंतचा प्रवास विचारतात. “तुमच्या आईची इच्छा पूर्ण झाली” असं ते तिला म्हणतात. त्यावर अलोलिका त्यांना म्हणते, “आईचं तर स्वप्न पूर्ण झालंच. पण त्यासोबत माझंही विमानप्रवासाचं स्वप्न पूर्ण झालं.” विमानप्रवासाचा उल्लेख करताच ती हसू लागते आणि आपला अनुभव सांगते. “एअरलाइन्स इतका पैसा घेतात आणि सामान त्यांच्याकडेच ठेवतात. आम्हाला रेल्वेनं प्रवास करायची सवय आहे. तेव्हा सीटखालीच आम्ही आमचं सामान ठेवतो. ते सामान सीटखाली सुरक्षित आहे का, हे आम्हाला सतत तपासावं लागतं. पण फ्लाइटमध्ये तसं नाहीये”, असं ती म्हणते. हे ऐकताच बिग बी हसू लागतात.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ

मुंबईत आल्यानंतर कसं वाटलं, याविषयी बोलताना अलोलिका पुढे सांगते, “बापरे, इतकं मोठं हॉटेल. जय हो केबीसी. माझं तर स्वप्न पूर्ण झालं. मी माझ्या स्वत:च्या पैशाने तर इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये राहू शकले नसते. माझ्या पतीकडेही एवढा पैसा नाही. केबीसीने सर्वकाही करून दाखवलं. जय हो केबीसी.” हे सर्व सांगताना ती स्वत:ही क्षणाक्षणाला हसत असते. तिला पाहून प्रेक्षकांना आणि बिग बींनाही हसू येतं. हॉटसीटवर बसलेल्या अलोलिकाने 12 प्रश्नांची उत्तरं योग्य दिली आहेत.

“मी तर काहीच अभ्यास केला नाही. इथे बाकीचे लोक तयारी करत होते, अभ्यास करत होते. मी तर इथे-तिथे फिरत होती. कारण मला विश्वास होता की मी हॉटसीटपर्यंत पोहोचणारच नाही”, असं ती म्हणताच पुन्हा एकदा सेटवर हशा पिकतो. अलोलिकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.