KBC 15 : आजोबांच्या प्रश्नावरून आजीसोबत भिडली सारा अली खान; उत्तर ऐकल्यानंतर पाहण्यासारखा होता चेहरा

'केबीसी 15'च्या शेवटच्या एपिसोडमध्ये ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर या नात सारा अली खानसोबत पोहोचल्या होत्या. यावेळी शेवटच्या प्रश्नादरम्यान दोघींमध्ये वादावादी झाल्याचं पहायला मिळालं. सैफ अली खानचे वडील आणि शर्मिला यांचे पती दिवंगत मंसूर अली खान पतौडी यांच्याविषयी हा प्रश्न होता.

KBC 15 : आजोबांच्या प्रश्नावरून आजीसोबत भिडली सारा अली खान; उत्तर ऐकल्यानंतर पाहण्यासारखा होता चेहरा
Sharmila Tagore and Sara Ali KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 02, 2024 | 12:35 PM

मुंबई : 2 जानेवारी 2024 | ‘कौन बनेगा करोडपती’ या क्वीज शोचा पंधरावा सिझन नुकताच संपुष्टात आला आहे. या सिझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री सारा अली खान तिची आजी शर्मिला टागोर यांच्यासोबत उपस्थित होती. आजी आणि नातीच्या या जोडीने शोमध्ये 12 लाख 50 हजार रुपये जिंकले. हा शेवटचा एपिसोड प्रेक्षकांसाठीही अत्यंत मनोरंजक ठरला. सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांनी ‘केबीसी 15’चा शेवटचा प्रश्न सारा अली खानचे आजोबा आणि शर्मिला टागोर यांचे दिवंगत पती मंसूर अली खान पतौडी यांच्याविषयी विचारला. मात्र या प्रश्नाचं उत्तर देताना सारा आणि शर्मिला या दोघींमध्ये चांगलीच वादावादी झाल्याचं पहायला मिळालं.

12.50 लाख रुपयांसाठीचा प्रश्न

अमिताभ बच्चन यांनी 12.50 लाख रुपयांसाठी सारा आणि शर्मिला यांना शेवटचा प्रश्न विचारला. “कोणत्या टीमच्या खेळाडूने मंसूर अली खान पतौडीच्या टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वांत तरुण कॅप्टन होण्याचा रेकॉर्ड मोडला होता?”, असा हा प्रश्न होता. बिग बींनी हा प्रश्न वाचला आणि त्यापुढे पर्याय सांगण्याआधीच शर्मिला टागोर यांनी सारासमोर साऊथ आफ्रिकाचं नाव घेतलं. मात्र जेव्हा बिग बींनी पर्याय सांगितले, तेव्हा त्यात साऊथ आफ्रिका हा पर्यायच नव्हता.

पुढे काय घडलं?

ए- वेस्ट इंडीज, बी- ऑस्ट्रेलिया, सी- इंग्लंड आणि डी- झिम्बाब्वे असे चार पर्याय बिग बींनी सांगितले. हे पर्याय ऐकताच शर्मिला यांनी लगेच झिम्बाब्वेचं नाव घेतलं. त्यावर सारा त्यांना विचारते, “तुम्हाला याबद्दल खात्री आहे का? तुम्ही आधी साऊथ आफ्रिकाचं नाव घेतलं होतं आणि आता ऑप्शनमध्ये साऊथ आफ्रिका नाही तर झिम्बाब्वेचं नाव घेत आहात. तुम्हाला या उत्तराबद्दल खात्री आहे का?” हे ऐकल्यानंतरही शर्मिला झिम्बाब्वे या उत्तरावर ठाम राहतात.

हे सुद्धा वाचा

सारा वारंवार त्यांना विचारते, तरीसुद्धा त्या झिम्बाब्वे या पर्यायावरच ठाम असतात. या प्रश्नाच्या वेळी सारा आणि शर्मिला यांच्याकडे दोन लाइफलाइन उपलब्ध होते. मात्र शर्मिला यांनी लाइफलाइन घेण्याचा विचार केला नव्हता. यापुढे सारा काही म्हणण्याआधीच शर्मिला यांनी सांगितलं की डी- झिम्बाब्वे या पर्यायाला लॉक करा. बडी अम्मा म्हणजेच शर्मिला यांना इतक्या तडकाफडकीने उत्तर देताना पाहून सारा थक्क होते. कोणत्याही लाइफलाइनशिवाय त्या ठामपणे उत्तर देतील, याची खात्री तिला नव्हती. मात्र बिग बींनी जेव्हा उत्तर सांगितलं, तेव्हा साराचा चेहरा बघण्यालायक होता.

शर्मिला यांनी सांगितलेलं उत्तर योग्य होतं. तेव्हा सारा टाळ्या वाजवून आजीचं कौतुक करते. ‘वेरी वेल डन’ असं ती आजीकडे पाहत म्हणते. त्यानंतर अमिताभ बच्चनसुद्धा शर्मिला यांना म्हणतात, “वेल प्लेड रिंकू दी”. बिग बी हे शर्मिला यांना रिंकू दी म्हणूनच हाक मारतात. उत्तराविषयी अधिक माहिती देताना बिग बी पुढे सांगतात, “झिम्बाब्वेचा टटेंडा टायबू जेव्हा 2004 मध्ये कर्णधार होता, तेव्हा त्याचं वय 20 वर्षे 358 दिवस इतकं होतं. तर मंसूर अली खान जेव्हा पहिल्यांदा भारताच्या टेस्ट क्रिकेटचे कॅप्टन बनले होते, तेव्हा त्यांचं वय 21 वर्षे 77 दिवस होतं.”

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.