‘आजही धार्मिक भेदभाव होतोय’, शंकराच्या मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री निराश

शंकराच्या मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्ती केली निराशा; म्हणाली, 'ती वेळ येईल आणि सर्वांना धर्माच्या आधारावर नव्हे तर माणसांसारखं वागवलं जाईल.'

'आजही धार्मिक भेदभाव होतोय', शंकराच्या मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री निराश
'आजही धार्मिक भेदभाव होतोय', शंकराच्या मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री निराश
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 9:43 AM

मुंबई : आजही धर्माच्या नावावर विवाद होत असल्याचं आणखी एक चित्र समोर आलं आहे. दक्षिणेतील अनेक मंदिरांमध्ये असे नियम आहेत ज्यामुळे आजही वाद निर्माण होतात. केरळ येथील एर्नाकुलम याठिकाणी Thiruvairanikulam हिंदू मंदिर आहे. मंदिरात दक्षिण सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमाला पॉल शंकराच्या दर्शनासाठी पोहोचली होती. पण अभिनेत्रीला मंदिरात दर्शनासाठी जाण्याची परवानगी नाकारली. मंदिर प्रशासनाने अमाला पॉल हिला शंकराच्या मंदिरात प्रवेश नाकारल्यानंतर अभिनेत्रीने निराशा व्यक्त केली आहे. या घटनेनं सध्या सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.

काय आहे पूर्ण प्रकरण? सोमवारी जेव्हा अभिनेत्री अमाला पॉल शिव मंदिरात दर्शनासाठी गेली. तेव्हा अभिनेत्रीला मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं, की लांब राहून दर्शन घ्या. मंदिर प्रशासनाने हिंदू धर्माचा दाखला देत सांगितले की, मंदिरात फक्त हिंदूच प्रवेश करू शकतात. त्यानंतर अभिनेत्रीने लांब उभं राहून दर्शन घेतलं.

View this post on Instagram

A post shared by Amala Paul (@amalapaul)

व्हिजिटर रजिस्टरमध्ये अमाला पॉल निराशा व्यक्त केली. अमाला पॉल हिने लिहिलं मंदिरात जावून दर्शन घेता आलं नाही, पण असं वाटलं की माझं दर्शन झालं आहे. पुढे अभिनेत्रीने लिहिलं, ‘२०२३ मध्ये देखील असा भेदभाव होत आहे. मी मंदिरात जावून दर्शन घेवू शकली नाही. ती वेळ लवकरच येईल आणि सर्वांना धर्माच्या आधारावर नव्हे तर माणसांसारखं वागवलं जाईल.’ अशी आशा अभिनेत्रीने याठिकाणी व्यक्त केली.

या प्रकरणानंतर जेव्हा मंदिर प्रशासनाला विचारण्यात आलं, तेव्हा ते म्हणाले, ‘फक्त मंदिराच्या नियमांचं पालन केलं. दुसऱ्या धर्मातील हिंदू अनुयायी याठिकाणी येत नाही, असं काही नाही. पण जेव्हा सेलिब्रिटी येतात तेव्हा वादाला तोंड फुटतं..’ अशी प्रतिक्रिया मंदिर प्रशासनाने दिली आहे.

अमाला पॉल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अमालाने अनेक तामिळ सिनेमांमध्ये भूमिका बजावत चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. अमाला आता लवकरच अभिनेता अजय देवगण स्टारर ‘भोला’ सिनेमात दिसणार आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने नागा चैतन्य, राम चरण, अल्लू अर्जुन यांच्यासोबत देखील काम केलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.