Pathaan: दीपिकाच्या ‘बेशर्म रंग’ गाण्याबाबत KGF फेम अभिनेत्याचं मोठं विधान; म्हणाला..

'पठाण'मधील 'बेशर्म रंग' गाण्याच्या वादात KGF फेम अभिनेत्याची उडी; दीपिकाच्या बोल्ड दृश्यांवर केलं महत्त्वपूर्ण वक्तव्य

Pathaan: दीपिकाच्या 'बेशर्म रंग' गाण्याबाबत KGF फेम अभिनेत्याचं मोठं विधान; म्हणाला..
PathaanImage Credit source: Youtube
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 9:39 AM

Pathaan Controversy: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशर्म रंग’ हे गाणं प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. या गाण्यातील दीपिकाच्या बोल्ड दृश्यांवरून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आता या गाण्याच्या वादात केजीएफ फेम अभिनेत्याने उडी घेतली आहे. ‘केजीएफ: चाप्टर 1’मध्ये भूमिका साकारणारा अभिनेता अनंत नाग याने बेशर्म रंग गाण्यावरून मोठं विधान केलं आहे. महिलेला अशा पद्धतीनं दाखवणं ही भारतीय संस्कृती नाही, असं त्यांनी म्हटलंय.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनंत नाग यांना बेशर्म रंग गाण्याच्या वादावर त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर ते म्हणाले, “महिलेला अशा पद्धतीने दाखवणं ही भारतीय संस्कृती नाही. जर सेन्सॉर बोर्डाने त्यांचं काम केलं असेल तर सर्वात आधी असं घडायलाच पाहिजे नव्हतं. चित्रपटांचं सोडा पण ओटीटी कंटेटकडे पाहिलं तर तिथेही अशीच आक्षेपार्ह दृश्ये पहायला मिळतात. सर्वकाही उघडपणे दाखवलं जातं आणि त्यावर अंकुश ठेवणारं कोणीच नाही.”

बेशर्म रंग या गाण्यात बरीच न्युडिटी असून त्याला प्रोत्साहन दिलं नाही पाहिजे, असं मत त्यांनी मांडलं. “मोठ्या आणि छोट्या पडद्यावर दाखवल्या जाणाऱ्या अशा न्युडिटी कंटेटला भारतीय सिनेमाने थांबवलं पाहिजे. आपल्या संस्कृती आणि परंपरेविरोधात गोष्टी दाखवल्या गेल्या तर लोकांमध्ये वाद निर्माण होणारच”, असं ते पुढे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पठाण या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर ‘बेशर्म रंग’ हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं गेलं. या गाण्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. दीपिकाने तिच्या करिअरमधील आतापर्यंतची सर्वांत बोल्ड दृश्ये या गाण्यात दिल्याचं म्हटलं गेलंय.

‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी या गाण्याची तुलना इन्स्टाग्राम रिल्सशी केली. “सुरुवातीला इन्स्टा रिल्स हे बॉलिवूड गाण्यांच्या वाईट कॉपीसारखं वाटायचं. आता बॉलिवूड गाणं हे इस्टा रिल्सची वाईट कॉपी असल्यासारखं वाटतंय”, असं त्यांनी ट्विट केलं होतं. पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.