KGF Chapter 2 Box Office Collection: ‘केजीएफ 2’ची पहिल्याच दिवशी बंपर कमाई; यशने स्वत:च्याच चित्रपटाचा मोडला विक्रम

कन्नड सुपरस्टार यशच्या (Yash) 'केजीएफ 2' (KGF Chapter 2) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशीच धमाका केला आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत.

KGF Chapter 2 Box Office Collection: 'केजीएफ 2'ची पहिल्याच दिवशी बंपर कमाई; यशने स्वत:च्याच चित्रपटाचा मोडला विक्रम
KGF Chapter 2Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 3:51 PM

कन्नड सुपरस्टार यशच्या (Yash) ‘केजीएफ 2’ (KGF Chapter 2) या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशीच धमाका केला आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. KGF2च्या हिंदी व्हर्जनने बंपर कमाई करत अनेक मोठ्या चित्रपटांना पछाडलं आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 53.95 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर भारतात 134.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने कमाईच्या आकड्याची माहिती दिली आहे. ‘वॉर’, ‘ठग्स ऑफि हिंदोस्तान’ यांसारख्या चित्रपटांना KGF2 ने मागे टाकलं आहे. केजीएफ: चाप्टर 1 नंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. (KGF Chapter 2 Box Office Collection)

केजीएफ 2ने मोडले विक्रम

केजीएफ 2- 53.95 कोटी रुपये वॉर- 50.75 कोटी रुपये ठग्स ऑफ हिंदोस्तान- 50.75 कोटी रुपये

यशने मोडला स्वत:च्याच चित्रपटाचा विक्रम

यशच्या केजीएफ- चाप्टर 1 या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचा लाइफटाइम बिझनेस 44.09 कोटी रुपये इतका झाला होता. हा आकडा यशच्या केजीएफ- चाप्टर 2ने पहिल्याच दिवशी पार केला आहे. कमाईचा हा आकडा पाहता येत्या काही दिवसांत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतरही चित्रपटांचे विक्रम मोडणार, यात काही शंका नाही.

ॲडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही या चित्रपटाने एस. एस. राजामौली यांच्या RRR या चित्रपटाचाही विक्रम मोडला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे चार दिवस राहिले असताना केजीएफ 2च्या हिंदी व्हर्जनची जवळपास 11 कोटी रुपयांची तिकिटं विकली गेली होती. या तुलनेत RRRच्या हिंदी व्हर्जनचं फक्त 5 कोटी रुपयांचं ॲडव्हान्स बुकिंग झालं होतं. चित्रपट व्यापार विश्लेषकांनी दिलेल्या माहितीनुसार, या कन्नड चित्रपटाने उत्तर भारतात ॲडव्हान्स बुकिंगद्वारे जवळपास 20 कोटी रुपयांची कमाई केली.

हेही वाचा:

VIDEO: ‘चंद्रमुखी’ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका

The Kashmir Filesच्या यशानंतर विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा; आता बनवणार The Delhi Files

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.