Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KGF फेम अभिनेत्याचं भाजपमध्ये प्रवेश; मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

यशची मुख्य भूमिका असलेल्या 'केजीएफ' चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अनंत नाग यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजप कार्यालयात मंत्री मुनिरत्न, सुधाकर आणि इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.

KGF फेम अभिनेत्याचं भाजपमध्ये प्रवेश; मोठ्या नेत्यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
KGFImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 12:19 PM

कर्नाटक : दिग्गज अभिनेते आणि माजी मंत्री अनंत नाग हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. अनंत नाग हे बुधवारी संध्याकाळी कर्नाटकचे भाजप अध्यक्ष नलीन कुमार कटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यशची मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ’ चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, अनंत नाग यांच्या पक्षप्रवेशावेळी भाजप कार्यालयात मंत्री मुनिरत्न, सुधाकर आणि इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत.

अनंत नाग यांनी जेएच पटेल यांच्या सरकारमध्ये शहरी विकास मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी 2004 मध्ये चमरजपेट विधानसभेतून जेडीएसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. ते सध्या 73 वर्षांचे असून 1980 मध्ये जनता पार्टीतून त्यांनी राजकीय करिअरची सुरुवात केली होती.

कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी राज्यात ॲक्टिव्ह मोडवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डासह मोठे नेते राज्यात प्रचार करत आहेत. पुढच्या सोमवारी पंतप्रधान मोदी शिमोगा इथं पोहोचणार आहेत आणि तिथे एका रॅलीला संबोधित करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत अनंत नाग?

अनंत नाग यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी 200 हून चित्रपट हे कन्नड भाषेसोबतच हिंदी, तेलुगू, मराठी, मल्याळम आणि इंग्रजी भाषेतील आहेत. रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी काम केलंय.

1973 मध्ये ‘संकल्प’ या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शक प्रोफेसर पी. व्ही. नंजाराज यांनी केलं होतं. या चित्रपटाला बरेच राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी ‘निशांत’ (1975), ‘भूमिका’ (1977), ‘मंथन’ (1976), ‘कोंद्रा’ (1977) आणि ‘कलयुग’ (1981) या हिंदी चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.