KGF स्टार यशच्या चिमुकल्याल्या मुलाचा क्यूट व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले ‘छोटा रॉकी भाई’!

केजीएफ स्टार यश हा 'फॅमिली मॅन' म्हणूनही ओळखला जातो. शूटिंगचं शेड्युल नसताना तो नेहमीच कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसतो. यशने 2016 मध्ये राधिका पंडितशी लग्न केलं. 2018 मध्ये राधिकाने मुलगी आयरा जन्म दिला.

KGF स्टार यशच्या चिमुकल्याल्या मुलाचा क्यूट व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले 'छोटा रॉकी भाई'!
KGF Star YashImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Feb 05, 2023 | 6:53 PM

बेंगळुरू: केजीएफ: चाप्टर 2 च्या यशानंतर कन्नड सुपरस्टार यशच्या फॅन फॉलोईंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. फक्त देशातच नाही जगभरात यशचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. चाहत्यांना केजीएफ: चाप्टर 3 ची प्रचंड उत्सुकता आहे. अशातच यश त्याच्या कुटुंबीयांसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे. तो सोशल मीडियावर कुटुंबीयांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सतत पोस्ट करत असतो. नुकताच त्याने मुलगा यथर्वचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आता छोट्या यशचे चाहते झाले आहेत.

या व्हिडीओत यश त्याच्या मुलासोबत घरात वेळ घालवताना दिसत आहे. यामध्ये यशने त्याचा हात पुढे केला आणि मुलाला बायसेप्स दाखवले. यशचे बायसेप्स पाहून यशर्व ‘सॉफ्ट’ असं म्हणतो. हे ऐकून यश चकीत होतो. नंतर त्याचा मुलगा यशला आपले बायसेप्स दाखवतो आणि त्याला ‘हार्ड’ म्हणतो. मुलाच्या या मस्करीपुढे यशसुद्धा नमतं घेतो आणि त्याला म्हणतो, “सुपरमॅन, तूच सर्वांत स्ट्राँग आहेस.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Yash (@thenameisyash)

बापलेकाच्या या क्यूट व्हिडीओने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. त्यावर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘रॉकी भाई ज्युनिअर रॉकी भाईसोबत’ असं एकाने लिहिलं. तर ‘रॉकी भाईसमोर आता तगडा प्रतिस्पर्धी आला आहे’, असं दुसऱ्या युजरने लिहिलं.

केजीएफ स्टार यश हा ‘फॅमिली मॅन’ म्हणूनही ओळखला जातो. शूटिंगचं शेड्युल नसताना तो नेहमीच कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना दिसतो. यशने 2016 मध्ये राधिका पंडितशी लग्न केलं. 2018 मध्ये राधिकाने मुलगी आयरा जन्म दिला. त्यानंतर 2019 मध्ये तिने मुलगा यथर्वला जन्म दिला. यशच्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल होतात.

यश आणि राधिकाची पहिली भेट एका टिव्ही शोच्या सेटवर झाली होती. 2004 मध्ये नंदगोकुला या टीव्ही शोच्या सेटवर दोघं भेटले होते. या पहिल्या भेटीत राधिकाला यश अहंकारी वाटला. कारण तो तिच्याशी एका शब्दाने बोललाच नव्हता. मात्र नंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.