Khatron Ke Khiladi 13 : लीक झाली KKK 13 च्या स्पर्धकांची यादी; चौथं नाव जाणून व्हाल थक्क

कोण आहेत KKK 13 चे स्पर्धक; यादी लीक झाल्यानंतर तुम्हीही म्हणाल, 'हा' सेलिब्रिटी खरंच झाळकणार रोहित शेट्टीच्या शोमध्ये?

Khatron Ke Khiladi 13 : लीक झाली KKK 13 च्या स्पर्धकांची यादी; चौथं नाव जाणून व्हाल थक्क
Follow us
| Updated on: Apr 06, 2023 | 3:28 PM

मुंबई : टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि साहसी रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ सीझन 13 धमाकेदार पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. सध्या सर्वत्र ‘खतरों के खिलाडी’ सीझन १३ ची चर्चा सुरु झाली आहे. ‘खतरों के खिलाडी’ सीझन १३ साठी चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. एवढंच नाही तर रोहित शेट्टी शोमध्ये स्पर्धकांना कोण-कोणते भयानक खेळ खेळायला लावणार याकडे देखील चाहत्यांचं लक्ष आहे. महत्त्वाचं म्हणजे नुकताच शोच्या स्पर्धकांची यादी लीक झाली आहे. ज्यामुळे ‘खतरों के खिलाडी’ सीझन १३ मध्ये कोण झळकणार हे चाहत्यांना कळालं आहे. त्यामुळे ‘खतरों के खिलाडी’चा नवा भाग चाहत्याच्या किती पसंतीस पडतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘खतरों के खिलाडी’ सीझन १३ च्या स्पर्धकांची पूर्ण यादी सोशल मीडियावर लीक झाली आहे. या यादीमध्ये ‘बिग बॉस १६’ च्या सदस्यांची देखील नावे आहेत. शिवाय टीव्ही विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी देखील ‘खतरों के खिलाडी’ सीझन १३ मध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे. यादीतील काही नावे जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल…

लीक झालेल्या स्पर्धकांची नावे

सौंदर्या शर्मा, अर्चना गौतम, प्रियंका चाहर चौधरी, शिव ठाकरे, आसिम रियाज, दिशा परमार, मुनव्वर फारुकी, सनाया इराणी, प्रिंस नरूला, अंजली अरोरा, नकुल मेहता हे सेलिब्रिटी ‘खतरों के खिलाडी’ सीझन १३ मध्ये झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे.

हे सुद्धा वाचा

नुकताच ‘बिग बॉस १६’ चा विजेती एमसी स्टॅन याचं देखील नाव आलं होतं. पण एमसी स्टॅन आणि सुम्बुल तौकीर खान यांनी रोहित शेट्टीला नकार दिला आहे. मिडिया रिपोर्टनुसार, शोच्या निर्मात्यांनी दोघांच्या मानधनात देखील मोठी वाढ केली होती. पण मोठं रक्कम मिळत असताना देखील स्टॅन आणि सुम्बुल यांनी शोसाठी नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, शोची शुटिंग अर्जेंटीना याठिकाणी होणार आहे. अर्जेंटीनामध्ये सीझन ९ आणि ७ ची देखील शुटिंग झाली होती. मे महिन्यातच शुटिंगसाठी स्पर्धक अर्जेंटिनाला रवाना होतील. १७ जुलैपासून शोचं टीव्हीवर प्रसारण होणार आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षकांनी ‘खतरों के खिलाडी’ सीझन १३ ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पाहता येणार आहे.

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.