AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुझा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करू’; भाजप प्रवेशच्या चर्चांदरम्यान ‘मख्खी’ फेम अभिनेत्याला धमकी

51 वर्षीय किच्चा सुदीप आतापर्यंत राजकारणापासून दूर राहिला आहे. मात्र भाजपात प्रवेश केल्यानंतर तो केवळ राज्यातच नाही तर राज्याबाहेरही पक्षाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करणार असल्याचं म्हटलं जातंय.

'तुझा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करू'; भाजप प्रवेशच्या चर्चांदरम्यान 'मख्खी' फेम अभिनेत्याला धमकी
Kiccha SudeepImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 05, 2023 | 11:38 AM
Share

बेंगळुरू : ‘मख्खी’ फेम कन्नड अभिनेता किच्चा सुदीप लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चांदरम्यान त्याला धमकी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. किच्चा सुदीप आणि त्याचा मॅनेजर जॅक मंजूला धमकीचं पत्र मिळालं आहे. या पत्रानंतर त्याने पुत्तनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तुझा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करू, अशी धमकी या पत्रातून सुदीपला देण्यात आली आहे. सुदीपचा जवळचा मित्र आणि त्याचा मॅनेजर जॅक मंजूने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याची धमकी

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, किच्चा सुदीपच्या मॅनेजरला सोशल मीडियावर त्याचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक करण्याची धमकी देणारं पत्र मिळालं आहे. यानंतर त्याने बेंगळुरूच्या पीएस पुत्तनहल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे आयपीसीच्या कलम 120 बी, 506 आणि 504 अंतर्गत एफआयआर दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

भाजप प्रवेशची चर्चा

गेल्या काही दिवसांपासून किच्चा सुदीपच्या भाजप प्रवेशच्या चर्चांनी जोर धरला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी तो भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पक्षात प्रवेश केल्यानंतर निवडणुकीसाठी तो मोठं कॅम्पेन करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. राज्यात भाजपने बऱ्याच कन्नड कलाकारांकडे यासाठी विनंती केल्याचं समजतंय. पुढच्या महिन्यात निवडणुकीचा प्रचार सुरू होईल. त्यामुळे पक्षाकडून ही जोरदार तयारी सुरू असल्याचं कळतंय. मात्र याबद्दल अद्याप किच्चा सुदीपकडून कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही.

51 वर्षीय किच्चा सुदीप आतापर्यंत राजकारणापासून दूर राहिला आहे. मात्र भाजपात प्रवेश केल्यानंतर तो केवळ राज्यातच नाही तर राज्याबाहेरही पक्षाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करणार असल्याचं म्हटलं जातंय. किच्चा सुदीपचे ‘विक्रांत रोना’ आणि ‘कब्जा’ हे चित्रपट नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले. ‘विक्रांत रोना’ या त्याच्या चित्रपटाला प्रेक्षक-समिक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला.

किच्चा सुदीपचा काल्पनिक अ‍ॅक्शन चित्रपट विक्रांत रोना या चित्रपटाची कथा ही एका रहस्यमय घटनेभोवती फिरणारी आहे, ज्यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणारा किच्चा सुदीप हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. थ्रीडी फॉरमॅटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कलेक्शनचा शानदार आकडा पार करून प्रेक्षकांना थिएटर्सच्या खुर्चीला खिळवून ठेवलं होतं. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 33 ते 35 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर रिलीजच्या चौथ्या दिवशी या चित्रपटाने 100 कोटींचा आकडा गाठला होता.

पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.