Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi 2023 : Kili Paul याला भारतीय सणांची भुरळ; होळीला ‘या’ गाण्यावर धरला ठेका

कायम बॉलिवूड गाण्यावर ठेका धरणाऱ्या किली पॉल याने होळीच्या दिवशी खास व्हिडीओ केला शेअर ; सध्या सर्वत्र किली पॉल याच्या व्हिडीओची चर्चा ...

Holi 2023 : Kili Paul याला भारतीय सणांची भुरळ; होळीला 'या' गाण्यावर धरला ठेका
Follow us
| Updated on: Mar 07, 2023 | 10:02 AM

Kili Paul : टांझानियाचा प्रसिद्ध सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल (Kili Paul) हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. किली पॉल बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरत त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. चाहते देखील किली पॉल याच्या प्रत्येक व्हिडीओला भरभरून प्रेम देतात. आता होळीच्या दिवशी देखील किली पॉल याने एका भोजपुरी गाण्यावर ठेका धरला आहे. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र किली पॉल याच्या व्हिडीओची चर्चा रंगत आहे. किलीने होळीच्या दिवशी व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे त्याला भारतीय सणांची भुरळ पडल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.

कायम बॉलिवूड गाण्यावर ठेका धरणाऱ्या किली पॉल याने होळीच्या दिवशी टुनटुन यादव याच्या ‘हमार जिला सिधा ठोकेला’ या भोजपुरी गाण्यावर ठेका धरला आहे. किली पॉल याच्या व्हिडीओला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं आहे. त्याच्या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एवढंच नाही तर, भोजपुरी गाण्याला देखील चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kili Paul (@kili_paul)

सांगायचं झालं तर किली पॉल कायम भारतीय गाण्यांवर लिपसिंक करत व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. त्याच्या व्हिडीओला प्रेक्षकांकडून प्रेम देखील मिळतं. किली पॉलचा प्रत्येक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात अनेक सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओला खूप पसंत करत आहेत.

किली पॉल (Kili Paul Instagram) हा इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. किली पॉल आणि त्याची बहिण निम कायम सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत असतात. दोघांच्या व्हिडीओला चाहत्यांकडून भरभरुन प्रेम देखील मिळतं.

किलीचे सोशल मीडियावर जवळपास 2.4 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. किली अनेकदा भारतात देखील आला आहे. बिग बॉसमध्ये देखील पाहुणा म्हणून उपस्थित राहिला होता. किली कायम चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसतो.

किली पॉल सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. जगभरातील अनेक लोक किली याला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. किली सतत चाहत्यांचं मनोरंजन करत असल्यामुळे चाहते देखील त्याच्या नव्या व्हिडीओच्या प्रतीक्षेत असतात.

किली सर्वात जास्त व्हिडीओ बॉलिवूड गाण्यांवर तयार करत असतो. पण किलीने  इतर भाषांमधील गाण्यांवर ठेरलेला ठेका देखील चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.