का तुटले आमिर खानचे दुसरे लग्न? किरण रावचा घटस्फोटाबद्दल थेट खुलासा, म्हणाली..
Aamir Khan and Kiran Rao Divorce : बाॅलिवूड अभिनेता आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आमिर खान याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. आमिर खान हा सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत आहे.
मुंबई : आमिर खान याचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला अजिबातच धमाका करण्यात यश मिळाले नाही. हेच नाही तर हा चित्रपट थेट फ्लाॅप गेला. या चित्रपटावर जोरदार टीका देखील करण्यात आली. आमिर खान याला लाल सिंह चड्ढा चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेलाय. मात्र, असे असताना देखील आमिर खान हा त्याच्या पर्सनल लाईफमुळे जोरदार चर्चेत दिसतोय. आमिर खान याची एक्स पत्नी किरण राव हिने नुकताच मोठा खुलासा केलाय.
किरण राव ही सध्या तिच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण राव हिने आमिर खान याच्यासोबतच्या तलाकवर भाष्य केलंय. किरण राव म्हणाली की, आमचा घटस्फोट झाल्यानंतरही आम्ही अजूनही एकसोबत काम करतो. मुळात म्हणजे आमचे नाते हे फक्त लग्नापर्यंत नक्कीच मर्यादित नाहीये.
आम्ही दोघेही जेंव्हा वैवाहिक नात्याबद्दल विचार करतो त्यावेळी आम्ही दोघे एकमेकांचे विचार ठेवतो. आम्हाला आमचे काम जवळ आणते. आमचे नाते हे खूप जास्त कैटुंबिक आणि पवित्र होते. ज्याला कोणते लग्न देखील तोडू शकले नाही. आमचा प्रामाणिकपणा हे आमच्या नात्याचे आधार आहे. मुळात म्हणजे आमच्यामध्ये कधीच भांडणे वगैरे अजिबातच झाली नाहीत.
आम्ही फक्त आमच्या नात्यावर परत एकदा विचार करू इच्छित होतो. आम्हाला आमचे लग्न पुढे ठेवायचेच नव्हते. परंतू आम्हाला आमचे कुटुंब तुटू देखील द्यायचे नव्हते. लोकांना नक्कीच हे नाॅर्मल वाटत नाहीत. घटस्फोटानंतरही एकत्र राहणे वगैरे. आम्ही एकाच इमारतीमध्ये राहतो आणि जेवणही शेअर करतो. खरं सांगायचे झाले तर आमचे लग्न तुटल्यानंतर आमचे नाते तुटले असते तर वाईट वाटले असते.
आमिर खान याची मुलगी इरा खान हिच्या लग्नाला देखील किरण राव उपस्थित होती. या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. किरण राव आणि इरा खान यांच्यामध्ये खूप जास्त चांगलीच मैत्री आहे. किरण राव ही आमिर खान याची दुसरी पत्नी आहे. किरण आणि आमिर खान यांचा एक मुलगा देखील आहे.