Salman Khan च्या सल्ल्यानंतर खरंच Move on करेल शहनाज गिल? अभिनेत्री म्हणाली…

सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत आजही शहनाज गिल; सलमान खान याने Move on करण्याचा सल्ला दिल्यानंतर अनेक दिवसांनी असं का म्हणाली अभिनेत्री? सध्या सर्वत्र शहनाजची चर्चा

Salman Khan च्या सल्ल्यानंतर खरंच Move on करेल शहनाज गिल? अभिनेत्री म्हणाली...
Follow us
| Updated on: Apr 21, 2023 | 11:27 AM

मुंबई : अभिनेत्री शहनाज गिल सध्या ‘किसी का भाई किसी जान’ सिनेमामुळे चर्चेत आहे. शहनाज पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर अभिनेता सलमान खान याच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. शहनाज आणि सलमान यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक देखील उत्सुक आहेत. सिनेमा रुपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान भाईजान याने शहनाजला Move On करण्याचा सल्ला दिला होता. ज्यामुळे सलमान आणि शहनाज तुफान चर्चेत आले होते. सलमानने दिलेल्या सल्ल्यावर अनेक दिवसांनी शहनाज हिने मोठं वक्तव्य केलं आहे. एका मुलाखतीत शहनाजने सलमानने दिलेल्या Move On करण्याच्या सल्ल्यावर वक्तव्य केलं आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, ‘सलमान खान नेहमी असंच म्हणतो. सलमान मला कामय सांगतो, तुझ्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. कधीही थांबू नकोस… दुःखी होवू नकोस… फक्त आणि फक्त काम कर.. तू करियरमध्ये खूप पुढे जाशील…’ शियाव शहनाजने सलमान खान याला मेहनतीने काम करेल असं सांगितलं… सध्या सर्वत्र शहनाज आणि सलमान यांची चर्चा आहे. (kisi ka bhai kisi ki jaan)

काय म्हणाला होता सलमान खान?

सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान सलमान शहनाजला म्हणाला होता की, ‘मी तर सांगत आहे शहनाज मूव्ह ऑन कर… तू मूव्ह ऑन करावं असं मला वाटतं… कारण माझं सगळ्या गोष्टींवर लक्ष असतं…’ असं सलमान ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान म्हणाला होता. सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील तुफान व्हायरल झाला होता.

हे सुद्धा वाचा

शहनाज हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत शहनाज रिलेशनशिपमध्ये होती. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये तुफान रंगल्या. शिवाय चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘बिग बॉस’च्या घरात देखील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. पण सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती.

पण गेल्या काही दिवसांपासून शहनाज आणि राघव जुयाल यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगत आहे. शहनाज आणि राघव याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शहनाज आणि राघव ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. पण शहनाज आणि राघव दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.