राघव जुयाल याच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहते Shehnaaz Gill? ‘हा’ फोटो व्हारयल होताच सत्य समोर

राघव जुयाल आणि शहनाज गिल यांच्या नात्याबद्दल मोठी अपडेट समोर, सेलिब्रिटींनी नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नसला, तरी व्हायरल होत असलेला दोघांचा फोटो पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल...

राघव जुयाल याच्यासोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहते Shehnaaz Gill? 'हा' फोटो व्हारयल होताच सत्य समोर
Follow us
| Updated on: Apr 16, 2023 | 10:42 AM

मुंबई : ‘बिग बॉस’च्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री शहनाज गिल (Shehnaaz Gill) लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. रिऍलिटी शोनंतर शहनाजला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहे. शहनाज सध्या तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोमध्ये शहनाज गिल आणि राघव जुयाल दिसत आहेत. सध्या सर्वत्र राघव आणि शहनाज यांच्या फोटोची चर्चा तुफान रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहनाज आणि राघव एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्यावर मौन बाळगलं आहे. नात्याची चर्चा रंगत असताना राघव याच्यासोबत शहनाज लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या चर्चा देखील तुफान रंगत आहेत.

राघव जुयाल आणि शहनाज गिल यांच्या नात्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. सेलिब्रिटींनी नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केला नसला, तरी व्हायरल होत असलेला दोघांचा फोटो पाहिल्यानंतर तुम्ही देखली दोघांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित कराल. सध्या दोघांचा जो फोटो व्हायरल होत आहे, त्या फोटोला कोलाज केलं असून शहनाझजआणि राघव पोझ देताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

शहनाज आणि राघव फोटोमध्ये एकाच ठिकाणी पोझ देतात दिसत आहेत. फोटो वेगळे असले तरी बॅकग्राउन्ड मात्र सारखाच असल्यामुळे राघव जुयाल आणि शहनाज गिल लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे. त्यांच्या फोटोवर अनेक चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

शहनाज हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती. कित्येक दिवस अभिनेत्री सोशल मीडिया आणि माध्यमांपासून देखील दू़र होती. पण आता शहनाजचं नाव राघव याच्यासोबत जोडण्यात येत आहे. पण रंगणाऱ्या चर्चांमध्ये किती सत्य आहे, हे राघव आणि शहनाज त्यांच्या भूमिकनंतर स्पष्ट होईल.

शहनाज आणि राघव लवकरत अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई, किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. शहनाज ‘किसी का भाई, किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. शहनाज हिला भाईजानने सिनेमात संधी दिली आहे. त्यामुळे बिग बॉस आपल्या खोडकर स्वभावाने सर्वांच्या मनावर राज्य करणारी शहनाज मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास यशस्वी ठरते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.