AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध क्रिकेटरसोबत गाजलं अफेअर, ना मिळालं प्रेम – ना करिअरमध्ये मिळालं यश; ती सध्या काय करते?

'किसना' या चित्रपटात भूमिका साकारलेली अभिनेत्री ईशा शरवानीला बॉलिवूडमध्ये विशेष यश मिळालं नाही. मात्र नृत्याच्या क्षेत्रात तिने आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. एकेकाळी ईशा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं.

प्रसिद्ध क्रिकेटरसोबत गाजलं अफेअर, ना मिळालं प्रेम - ना करिअरमध्ये मिळालं यश; ती सध्या काय करते?
अभिनेत्री इशा शरवानीImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 29, 2023 | 2:53 PM
Share

मुंबई | 29 सप्टेंबर 2023 : 2005 मध्ये सुभाष घई दिग्दर्शित ‘किसना’ या चित्रपटातून अभिनेत्री ईशा शरवानीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत भूमिका साकारली होती. त्यानंतर ईशाने ‘यू मी और हम’, ‘दरवाजा बंद रखो’, ‘लक बाय चान्स’, ‘करिब करिब सिंगल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. इरफान खानच्या ‘करिब करिब सिंगल’ या चित्रपटानंतर ईशा फिल्म इंडस्ट्रीपासून दूर गेली. मात्र सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असते. इंस्टाग्रामवर ती तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. इशा सिंगल मदर असून तिचा एक मुलगा आहे. मुलासोबत ती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये राहते.

इशाचं फिल्मी करिअर जरी फार काळ टिकलं नसलं तरी तिचा छंद ती आजही जोपासते. ईशा ही एक इंडियन कंटेम्पररी डान्सर आहे आणि एरियल डान्ससाठी ती विशेष ओळखली जाते. सध्या ती डान्सवर लक्ष केंद्रित करत असून जगभरात तिचे लाईव्ह डान्स परफॉर्मन्स आयोजित केले जातात. यासोबतच ती नृत्याचे प्रशिक्षणही देते.

ईशा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली. भारतीय क्रिकेटर झहीर खानसोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. जवळपास आठ वर्षांपर्यंत हे दोघं रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटलं जातं. झहीर आणि ईशाला अनेकदा एकत्र पाहिलं गेलं. मात्र या दोघांनी कधीच माध्यमांसमोर नात्याची कबुली दिली नव्हती. इतकंच नव्हे तर ईशा आणि झहीर यांच्या लग्नाच्याही जोरदार चर्चा होत्या. मात्र 2012 मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर झहीर खानने 2017 मध्ये अभिनेत्री सागरीका घाटगेशी लग्न केलं. तर ईशा सध्या सिंगल मदर आहे.

एकल मातृत्वाविषयी ईशा एका मुलाखतीत म्हणाली होती, “मी अत्यंत स्वतंत्र राहणारी स्त्री आहे. मी आर्थिकदृष्ट्या स्थिर आहे आणि माझ्या मुलाचं पालनपोषण मी स्वत: करते. तुम्ही एकटे पालक असाल किंवा नसाल, मुलांचं संगोपन करणं हा एक सुंदर अनुभव आहे. त्यातून आपणही बरंच काही शिकतो.” ईशाने हिंदीसोबतच तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलंय. याशिवाय तिने ‘झलक दिखला जा’च्या पाचव्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. या सिझनमध्ये तिच्या डान्सचं खूप कौतुक झालं होतं. मात्र शो दरम्यान जखमी झाल्यामुळे तिला त्यातून माघार घ्यावी लागली होती.

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.