KL Rahul-AthiyaShetty | केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाची जोरदार पार्टी; खंडाळ्याच्या फार्महाऊसमधील व्हिडीओ व्हायरल

21 जानेवारीपासून या फार्महाऊसवर लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. यादरम्यान केएल राहुल आणि अथियाच्या संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

KL Rahul-AthiyaShetty | केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाची जोरदार पार्टी; खंडाळ्याच्या फार्महाऊसमधील व्हिडीओ व्हायरल
KL Rahul-AthiyaShetty | केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाची जोरदार पार्टीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 23, 2023 | 8:16 AM

खंडाळा: टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुल आज (23 जानेवारी) अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. अथियाचे वडील आणि बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे. 21 जानेवारीपासून या फार्महाऊसवर लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली. या लग्नाला मोजकेच पाहुणे उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. यादरम्यान केएल राहुल आणि अथियाच्या संगीत कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

केएल राहुल आणि अथिया हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. या लग्नसोहळ्याला फक्त 100 पाहुणे उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. तर इतर काही सेलिब्रिटींप्रमाणेच अथिया आणि केएल राहुलनेही पाहुण्यांना ‘नो फोन’ पॉलिसीचं पालन करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर लीक होणार नाहीत. या लग्नाला जॅकी श्रॉफ, सलमान खान, अक्षय कुमार, एम. एस. धोनी, विराट कोहली हे सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा

23 जानेवारी रोजी अथिया आणि राहुल पारंपरिक पद्धतीने लग्नबंधनात अडकणार आहेत. 22 जानेवारी रोजी संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये सुनील शेट्टी यांचा फार्महाऊस लग्नासाठी सजवण्यात आल्याचं पहायला मिळत आहे. तर मोठमोठ्याने गाणीही वाजवली जात आहेत. ‘अभी तो पार्टी शुरू हुई है’ या गाण्यावर पाहुण्यांनी ठेका धरला.

रविवारी सुनील शेट्टीने माध्यमांसमोर येत मुलीच्या लग्नाविषयी माहिती दिली होती. त्याचप्रमाणे लग्नानंतर अथिया आणि राहुल माध्यमांसमोर येऊन फोटोसाठी पोझ देतील, असंही त्यांनी सांगितलं. “उद्या (सोमवारी) मुलांना घेऊन येईन. खूप खूप धन्यवाद”, असं सुनील शेट्टी म्हणाले.

2019 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून या दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांची चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनीसुद्धा सोशल मीडियावर अथियाच्या डेटिंग लाइफविषयी हिंट दिली होती. 2021 मध्ये अथियाच्या वाढदिवशी केएल राहुलने तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत रिलेशनशिप जाहीर केलं होतं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.