KL Rahul Athiya Shetty Wedding | सुनील शेट्टीच्या फार्महाऊसमध्ये सजला केएल राहुल-अथियाचा मंडप

सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. आजपासून (22 जानेवारी) लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.

KL Rahul Athiya Shetty Wedding | सुनील शेट्टीच्या फार्महाऊसमध्ये सजला केएल राहुल-अथियाचा मंडप
KL Rahul and Athiya ShettyImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 11:18 AM

खंडाळा: बॉलिवूड इंडस्ट्रीत पुन्हा एकदा सनई-चौघडे वाजत आहेत. अभिनेते सुनील शेट्टी यांची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी ही टीम इंडियाचा स्टार फलंदाज केएल राहुलशी लग्नगाठ बांधणार आहे. सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. आजपासून (22 जानेवारी) लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. अथिया आणि केएल राहुलच्या लग्नमंडपाचा व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे.

या लग्नसोहळ्याला फक्त 100 पाहुणे उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. तर इतर काही सेलिब्रिटींप्रमाणेच अथिया आणि केएल राहुलनेही पाहुण्यांना ‘नो फोन’ पॉलिसीचं पालन करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून लग्नाचे फोटो सोशल मीडियावर लीक होणार नाहीत. या लग्नाला जॅकी श्रॉफ, सलमान खान, अक्षय कुमार, एम. एस. धोनी, विराट कोहली हे सेलिब्रिटी हजेरी लावणार असल्याचं कळतंय.

हे सुद्धा वाचा

अथिया आणि केएल राहुल हे सोमवारी (23 जानेवारी) लग्नबंधनात अडकणार आहेत. खंडाळा इथल्या फार्महाऊसवर लग्नमंडप सजला असून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

संगीत कार्यक्रमात अथियाचे मित्रमैत्रिणी, भाऊ अहान शेट्टी, आई माया शेट्टी आणि वडील सुनील शेट्टी हे डान्स परफॉर्म करणार असल्याचंही समजतंय. या लग्नाला बॉलिवूडमधील मोजकेच सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.

2019 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून या दोघांची भेट झाली. पहिल्या भेटीतच दोघांची चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनीसुद्धा सोशल मीडियावर अथियाच्या डेटिंग लाइफविषयी हिंट दिली होती. 2021 मध्ये अथियाच्या वाढदिवशी केएल राहुलने तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत रिलेशनशिप जाहीर केलं होतं.

अथियाने 2015 मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती मुबारकां (2017) आणि मोतीचूर चकनाचूर (2019) या दोन चित्रपटांमध्येच झळकली आहे. अथिया लवकरच फुटबॉलपटू अफशान आशिकचा बायोपिक ‘होप सोलो’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं वृत्त आहे.

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.