BB OTT 2 | आई-वडिल विभक्त, लहान वयामध्येच सोडले शिक्षण, आज आहे कोट्यावधी संपत्तीची मालकीन, जाणून घ्या आशिका भाटिया हिच्याबद्दल

गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅस ओटीटी 2 तूफान चर्चेत आहे. चक्क बिग बाॅस ओटीटी 2 च्या घरात लिपलाॅक करताना आकांक्षा पुरी ही दिसली होती. आकांक्षा पुरी हिने कॅमेऱ्यासमोर लिपलाॅक केल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. बिग बाॅस ओटीटी 2 ला सलमान खान हा होस्ट करत आहे.

BB OTT 2 | आई-वडिल विभक्त, लहान वयामध्येच सोडले शिक्षण, आज आहे कोट्यावधी संपत्तीची मालकीन, जाणून घ्या आशिका भाटिया हिच्याबद्दल
Follow us
| Updated on: Jul 16, 2023 | 5:05 PM

मुंबई : नुकताच आशिका भाटिया हिने बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss Ott 2) मध्ये वाइल्डकार्ड एंट्री केलीये. पहिल्यांदाच दिवशी बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये धमाका करताना आशिका भाटिया ही दिसलीये. विशेष म्हणजे सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही आशिका भाटिया हिची बघायला मिळते. कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास व्हिडीओ शेअर करताना आशिका भाटिया ही दिसते. आशिका भाटिया (Aashika Bhatia) हिने आपल्या करिअरची सुरूवात बालकलाकार म्हणून केली. विशेष म्हणजे आपल्या करिअरसाठी छोट्या वयामध्येच आशिका भाटिया हिने शिक्षण सोडले आणि आपले पूर्ण लक्ष हे अभिनयावर केंद्रीत केले. टीव्ही विश्वातील एक मोठे नाव आशिका भाटिया हे आहे.

फक्त टीव्ही मालिकांमध्ये नाही तर थेट सलमान खान याच्या हिट चित्रपटामध्ये आशिका भाटिया हिने सलमान खान याच्या बहिणीची भूमिका देखील साकारलीये. सलमान खान आणि सोनम कपूर यांचा 2015 मध्ये रिलीज झालेला प्रेम रतन धन पायो या चित्रपटात आशिका भाटिया ही सलमान खान याच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती.

परवरिश कुछ खट्टी कुछ मीठी या मालिकेत गुणवंत कौर अहलूवालिया हिची भूमिका साकारताना आशिका भाटिया ही दिसली. आशिका हिचा जन्म गुजरातमधील सूरत शहरात झाला असून तिचे वडील एक व्यावसायिक आहेत. मात्र, आई वडील वेगळे झाल्यानंतर आईसोबत आशिका भाटिया ही मुंबईमध्ये शिफ्ट झाली.

मालिकेमध्ये मीराचे पात्र साकारत असताना आशिका भाटिया हिने आपले शालेय शिक्षण सोडले. इतकेच नाही तर आशिका भाटिया हिने एका वर्षामध्ये तब्बल 12 किलो वजन देखील कमी केले. अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्यानंतर आता बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये धमाका करताना नक्कीच आशिका भाटिया ही दिसणार आहे.

विशेष म्हणजे आशिका भाटिया ही कोट्यावधी संपत्तीची मालकीन आहे. मुंबईमध्ये देखील आशिका भाटिया हिचे एक आलिशान घर आहे. 14 कोटी संपत्तीची मालकीन ही आशिका भाटिया आहे. अत्यंत लग्झरी लाईफ आशिका भाटिया ही जगते. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील आशिका भाटिया ही तगडी कमाई करते. आशिका भाटिया हिने शेअर केलेली पोस्ट सोशल मीडियावर कायमच व्हायरल होताना दिसते.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.