AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप महाराष्ट्राचा स्वर सम्राट, मुलगा सेंच्युरी मिलमध्ये; अशी झाली मिलिंद शिंदेंची जडणघडण

महाराष्ट्राचे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्याची परंपरा त्यांचे तीन चिरंजीव आनंद, मिलिंद आणि दिनकर शिंदे यांनी पुढे नेली. (know about marathi playback singer milind shinde)

बाप महाराष्ट्राचा स्वर सम्राट, मुलगा सेंच्युरी मिलमध्ये; अशी झाली मिलिंद शिंदेंची जडणघडण
मिलिंद शिंदे, पार्श्वगायक
| Updated on: Mar 06, 2021 | 9:56 AM
Share

मुंबई: महाराष्ट्राचे स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्याची परंपरा त्यांचे तीन चिरंजीव आनंद, मिलिंद आणि दिनकर शिंदे यांनी पुढे नेली. आनंद-मिलिंद या जोडगळीने तर आपल्या गीतांनी महाराष्ट्राला अक्षरश: ठेका धरायला लावलं आहे. आनंद यांच्याप्रमाणेच मिलिंद शिंदे सुद्धा गुणी गायक म्हणून सर्व परिचित आहेत. त्यांची अनेक लोकगीतं आणि आंबेडकरी गीतं आजही मराठी मनावर रुंजी घालतात. आनंद यांच्याप्रमाणे मिलिंद यांनाही गायक म्हणून नावारुपाला येण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. अथक मेहनत घ्यावी लागली. मिलिंद यांच्या या संघर्षाची ही गाथा. (know about marathi playback singer milind shinde)

अन् सेंच्युरी मिलमध्ये नोकरी धरली

प्रल्हाद शिंदे हे महाराष्ट्राचे स्वर सम्राट म्हणून लोकप्रिय होते. त्यांच्या गाण्यांनी जातधर्माच्या सीमा ओलांडल्या होत्या. प्रचंड लोकप्रियता होती. गाण्याची कार्यक्रमही मिळत होते. पण त्याकाळी गायकांना पैसा म्हणावा तसा मिळत नव्हता. त्यामुळे शिंदे यांच्या घरात पैशाची नेहमीच चणचण असे. घरखर्च चालवणे कठिण होऊन जात होते. 1975चा तो काळ होता. त्यामुळे आनंद, मिलिंद आणि दिनकर शिंदे या तिघा भावांना सेंच्युरी मिलमध्ये नोकरी करावी लागली. बाप महाराष्ट्राचा स्वर सम्राट आणि मुलं मिल कामगार अशी विसंगत परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती. पण परिस्थितीपुढे काहीच इलाज नव्हता.

अन् परिस्थिती बदलू लागली

सेंच्युरी मिलमध्येच काम करत असताना ‘केला गणपती, झाला मारुती’ ही आनंद-मिलिंद जोडगळीची कॅसेट बाजारात आली. या कॅसेटमधील गाण्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला. त्यानंतर ‘जवा नवीन पोपट हा’ ही कॅसेट आली आणि शिंदे घराण्याची हालाखीची परिस्थितीही दूर झाली. ‘केला गणपती, झाला मारुती’ या कॅसेटमधील,

सांगा वहिनी तुम्ही तुमच्या धाकट्या बहिणीला, जोडी माझी तिची औंदा लागू द्या लायनीला…

हे गाणं तर त्या काळात घराघरात वाजत होतं. लग्न समारंभात तर हे गाणं हमखास वाजवलं जायचं. या कॅसेटमुळे आनंद-मिलिंद यांच्या गायन क्षेत्रातील पदार्पणातील अनेक अडथळे दूर केले.

ती सल अजूनही कायम

मिलिंद शिंदे यांचा आवाज हा प्रल्हाद शिंदे यांच्या जातकुळीतील आहे. त्यांना शास्त्रीय संगीताची बैठकही आहे. असं असूनही त्यांना गायक म्हणून हवा तसा स्कोप मिळालेला नाही. त्यांनी अनेक सिनेमांसाठी गाणी गायली. पण सिनेक्षेत्रात हवा तसा स्कोप मिळाला नसल्याची सल ते आजही बोलून दाखवतात.

नो रियाज

मिलिंद यांना आवाजाची नैसर्गिक देणगी मिळाली आहे. आवाज जपण्यासाठी ते विशेष काही करत नाहीत. एवढंच काय ते रियाज सुद्धा करत नाहीत. त्यावर मला माझ्या आवाजाची रेंज माहीत आहे, त्यामुळे रियाज करत नसल्याचं ते सांगतात. गाणं समजून घ्यायचं आणि सुस्पष्ट शब्दोच्चारात ते रसिकांपर्यंत पोहोचवायचं, या दोन गोष्टींवर मी अधिक भर देतो. त्यामुळे गाणं रंगतं, असंही ते सांगतात.

प्रल्हादचं पॉर ही ओळख अधिक आवडते

आनंद-मिलिंद यांची महाराष्ट्रात गायक म्हणून स्वतंत्र ओळख आहे. पण तरीही मिलिंद यांना प्रल्हादचं पॉर ही ओळख अधिक भावते. जेव्हा कोणी बुजुर्ग आम्हाला प्रल्दाचं पॉर म्हणून हाक मारतात, तेव्हा भरून आल्यासारखं वाटतं असं मिलिंद सांगतात. लता मंगेशकर, मोहम्मद रफी यांची गाणी ऐकण्याबरोबरच वाचन-मनन करणं आणि संगणकावर गेम खेळणं त्यांना खूप आवडतं.

काही गाजलेली गाणी

अरे, सागरा… भीम माझा येथे निजला, शांत हो जरा….अरे सागरा….

आणि

सांग सजणे सांग माझा छोटाय कुठाय गं, लहाना गेला ढोरं वळायला मोठा कुठाय गं….

आणि

काय राव तुम्ही, काय राव तुम्ही, धोतऱ्याच्या धंद्यात भरपूर कमावलं, पण बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं…  (साभार, ‘आंबेडकरी कलावंत’मधून) (know about marathi playback singer milind shinde)

संबंधित बातम्या:

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

दहा हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीसाठी जोडवेही सोन्याचे; आनंद शिंदेंचे हे किस्से माहीत आहेत काय?

‘पोपटा’चं गाणं सर्वात आधी कुणी गायलं?; आनंद शिंदेंकडे ते कसं आलं?; वाचा आनंद शिंदेंना स्टार बनविणाऱ्या गाण्याचा किस्सा!

(know about marathi playback singer milind shinde)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.