सेलिब्रिटींच्या मुलांची शाळा धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बनवण्यासाठीचा खर्च किती?

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलबद्दल लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. मुळात म्हणजे या शाळेत मोठ्या प्रमाणात स्टार किड्स हे शिकतात. नुकताच एक प्रोग्राम या शाळेत पार पडला. यावेळी बाॅलिवूडचे अनेक कलाकार हे आपल्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी पोहचल्याचे बघायला मिळाले.

सेलिब्रिटींच्या मुलांची शाळा धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल बनवण्यासाठीचा खर्च किती?
Follow us
| Updated on: Dec 21, 2023 | 6:10 PM

मुंबई : धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अनेक स्टार किड्स शिक्षण घेतात. विशेष म्हणजे नुकताच सोशल मीडियावर याच स्कूलमधील प्रोग्रामचे अनेक व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. यावेळी बाॅलिवूडच्या अनेक स्टारने उपस्थिती लावली. अभिनेत्यांच्या मुलांपासून ते क्रिकेटर आणि मोठ्या मोठ्या उद्योगपतींची मुले या शाळेत शिक्षण घेतात. या स्कूलच्या संस्थापिका नीता अंबानी आहेत. विशेष म्हणजे धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल हे नीता अंबानी यांचे स्वप्न होते.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही मुंबईच्या बांद्रा-कुर्ला काॅम्प्लेक्समध्ये आहे. या स्कूलची स्थापना ही 2003 मध्ये करण्यात आली. ही लग्झरी स्कूल तयार करण्यासाठी दहा महिन्यांचा कालावधी लागला. ही स्कूल तयार करण्यासाठी तब्बल 20 कोटींचा खर्च आलाय. प्रत्येक सुविधा या स्कूलमध्ये आहे. विद्यार्थ्यांना स्कूलमध्ये येताना डब्बा देखील घेऊन येण्याची गरज नाहीये.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल ही सात मजली आहे. एकदम खास फर्निचर, प्रत्येक क्लास रूममध्ये मल्टीमीडिया प्रोजेक्टर, ब्रॉडबॅंड इंटरनेट कनेक्शन, लॉकर्स अशा असंख्य सुविधा या स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आल्यात. फक्त हेच नाही तर बास्केबॉल कोर्ट, टेनिस, लर्निंग सेंटर, योगा रूम, सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स या सुविधा देखील आहेत.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शाहरूख खान याचा मुलगा अबराम खान, करीना कपूर खान हिचा मुलगा तैमुर अली खान, करण जोहर याचा मुलगा आणि मुलगी, शाहिद कपूर याचा मुलगा आणि मुलगी, रोहित शर्मा याची मुलगी समायरा शर्मा, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या बच्चन हे या शाळेचे विद्यार्थी आहेत.

सारा अली खान, सुहाना खान, आर्यन खान, खुशी कपूर, जान्हवी कपूर, सचिन तेंडूलकर याची मुलगी आणि मुलगा असे असंख्य स्टार किड्स याच शाळेत शिकले आहेत. विशेष म्हणजे या शाळेतील शिक्षणांना देखील तगडी पगार दिली जाते. अमिताभ बच्चन देखील या स्कूलच्या अनेक प्रोग्राममध्ये उपस्थित असतात. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलबद्दल लोकांमध्ये एक क्रेझ बघायला मिळते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.