अन् जान्हवी कपूरने भर शोमध्ये घेतलं राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचं नाव

अभिनेत्री जान्हवी कपूरने नुकतीच 'कॉफी विथ करण 8' या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये चुकून जान्हवीच्या तोंडून तिच्या बॉयफ्रेंडचं नाव बाहेर पडलं. त्यामुळे जान्हवीन भर चॅट शोमध्ये बॉयफ्रेंडचा खुलासा केल्याचं म्हटलं जात आहे. जान्हवी महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट करत आहे.

अन् जान्हवी कपूरने भर शोमध्ये घेतलं राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचं नाव
Janhvi Kapoor and Shikhar PahariyaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 01, 2024 | 3:20 PM

मुंबई : 1 जानेवारी, 2024 | निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये आलेला प्रत्येक सेलिब्रिटी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही ना काही बोलूनच जातो. या सेलिब्रिटींना कसं बोलतं करायचं, हे करणला खूप चांगल्याप्रकारे माहीत आहे. ‘कॉफी विथ करण 8’च्या आगामी एपिसोडमध्ये जान्हवी कपूर आणि खुशी कपूर या दोघी बहिणी हजेरी लावणार आहेत. या नव्या एपिसोडचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पहायला मिळतंय की, जान्हवीने चुकून तिच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे. तिच्या तोंडून अखेर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाचं नाव बाहेर पडलं.

करण जोहर जान्हवीला तिच्या स्पीड डायलमध्ये असलेल्या तीन लोकांची नावं विचारतो. त्यावर उत्तर देताना पटकन जान्हवी बोलून जाते, “पापा, खुशू आणि शिखू.” शिखू म्हणजेच शिखर पहाडिया. गेल्या काही काळापासून या दोघांच्या डेटिंगच्या जोरदार चर्चा आहेत. देवदर्शनालाही शिखर आणि जान्हवी एकत्र गेले आहेत. शिखर पहाडिया हा राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. वीर आणि शिखर हे भाऊ-भाऊ आहेत. जान्हवी आणि शिखर यांचं एकाच शाळेत शिक्षण झालं आहे. त्यामुळे शाळेपासूनच दोघं एकमेकांना ओळखतात.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

या एपिसोडमध्ये फक्त जान्हवीलाच नाही तर खुशी कपूरलाही तिच्या खासगी आयुष्याविषयी प्रश्न विचारला गेला. ‘द आर्चीज’ या चित्रपटातून खुशी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील तिचा सहकलाकार वेदांग रैनासोबत खुशीचं नाव जोडलं जातंय. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे असा प्रश्न विचारला असता खुशी म्हणाली, “ओम शांती ओम या चित्रपटातील एक सीन तुम्हाला माहीत आहे का? त्या सीनमध्ये काही जण म्हणतात, ओम आणि मी फक्त चांगले मित्र होतो.”

जान्हवीच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास ती लवकरच ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावसोबत झळकणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्सचा हा चित्रपट येत्या 19 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. शरन शर्माने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याशिवाय ती ज्युनियर एनटीआर आणि सैफ अली खान यांच्यासोबत ‘देवारा’ या चित्रपटातही ती काम करणार आहे.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.