Koffee With Karan 8 : लग्नाच्या 3 वर्षे आधीच दीपिका-रणवीरने गुपचूप उरकलेला साखरपुडा? करणचा सवाल

करण जोहरचा कॉफी विथ करण हा चॅट शो चांगलाच लोकप्रिय आहे. यामध्ये विविध सेलिब्रिटी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावतात आणि करण त्यांना विविध प्रश्न विचारतो. नुकताच या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये दीपिका-रणवीरने मोठा खुलासा केला आहे.

Koffee With Karan 8 : लग्नाच्या 3 वर्षे आधीच दीपिका-रणवीरने गुपचूप उरकलेला साखरपुडा? करणचा सवाल
Karan Johar and Ranveer DeepikaImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 12:32 PM

मुंबई : 23 ऑक्टोबर 2023 | करण जोहरच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा आठवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या 26 ऑक्टोबरपासून हा शो सुरू होणार असून त्याचा पहिला प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. करणच्या पहिल्याच एपिसोडमध्ये बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने हजेरी लावली आहे. शोच्या प्रोमोमध्ये हे दोघं विविध मुद्द्यांवर मजेशीर गप्पा मारताना दिसतात. यादरम्यान करणने दीपिका-रणवीरला त्यांच्या साखरपुड्याविषयी प्रश्न विचारला. लग्नाआधी तीन वर्षांपूर्वीच दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकला होता का, असा सवाल करणने विचारला.

2015 मध्ये तुम्ही दोघांनी साखरपुडा केला होता का, असा प्रश्न करणने विचारल्यावर रणवीर म्हणतो, “मी तिला 2015 मध्येच प्रपोज केलं होतं. दुसरी एखादी व्यक्ती तिच्या आयुष्यात येण्याआधीच मी विचार केला की आपणच आधी बुकिंग केलेली बरी.” हे ऐकल्यानंतर दीपिका म्हणते “अॅडव्हान्स बुकिंग”. त्यानंतर करण आणि रणवीरसुद्धा हसू लागतात. या प्रोमो व्हिडीओमध्ये दीपिकाला करणने असाही प्रश्न विचारला की, “तू रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात रणवीरने साकारलेल्या रॉकी रंधावाच्या भूमिकेसारख्या व्यक्तीला डेट करशील का?” त्यावर दीपिका मजेशीरपणे म्हणते, “मी रॉकी रंधावाशीच लग्न केलं आहे.”

हे सुद्धा वाचा

या व्हिडीओमध्ये करण दीपिकाला असाही प्रश्न विचारताना दिसतोय की, तिला रणवीरशिवाय कोणासोबतची केमिस्ट्री आवडते. त्यावर उत्तर देताना दीपिकाने हृतिक रोशनचं नाव घेतलं. हृतिकसोबतची केमिस्ट्री चांगली जमते, असं ती म्हणाली. विशेष म्हणजे दीपिकाचा आगामी चित्रपट हा हृतिकसोबतच आहे. ‘फायटर’ या चित्रपटात दोघं एकत्र काम करणार आहेत.

दीपिका आणि रणवीरने 2018 मध्ये लग्न केलं. नोव्हेंबर 2018 मध्ये इटलीत या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्नाला फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार उपस्थित होता. लग्नाच्या आधी हे दोघं जवळपास सहा वर्षे एकमेकांना डेट करत होते. संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढली.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.