Kriti Sanon | क्रिती सनॉन हिचा तो व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी लावला डोक्याला हात, नेटकरी म्हणाले, पाहा ही ‘सीता’…

बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन ही आदिपुरुष चित्रपट रिलीज झाल्यापासून प्रचंड चर्चेत आहे. आदिपुरुष चित्रपट मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. आदिपुरुष चित्रपटात क्रिती सनॉन ही माता सीतेच्या भूमिकेमध्ये होती. आदिपुरुष हा चित्रपट फ्लाॅप गेलाय. चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवलीये.

Kriti Sanon | क्रिती सनॉन हिचा तो व्हिडीओ व्हायरल होताच लोकांनी लावला डोक्याला हात, नेटकरी म्हणाले, पाहा ही 'सीता'...
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 8:05 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन (Kriti Sanon) ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. क्रिती सनॉन आणि प्रभास यांचा काही दिवसांपूर्वीच आदिपुरुष हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे आदिपुरुष (Adipurush) हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक होता. चित्रपट रिलीज होण्याच्या अगोदर चित्रपटाची जोरदार चर्चा बघायला मिळाली. मात्र, प्रत्यक्षात चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटावर मोठ्या प्रमाणात टिका करण्यात आली. इतकेच नाही तर न्यायालयाने देखील चित्रपटाच्या निर्मात्यांना फटकारले. हिंदू देवतांचा अपमान चित्रपटात केल्याचा सतत आरोप केला जात आहे. आदिपुरुष चित्रपट(Movie) मोठ्या वादात सापडला.

आदिपुरुष हा चित्रपट ओम राऊत यांचा अत्यंत बिग बजेटचा चित्रपट आहे. आदिपुरुष चित्रपटाचे 500 कोटींचे बजेट आहे. लोकांना चित्रपटातील डाॅयलाॅग देखील अजिबातच आवडले नाहीत. अनेकांनी चित्रपटातील डाॅयलाॅगवरून निर्मात्यांना टार्गेट केले. आदिपुरुष हा चित्रपट फ्लाॅप गेल्याने निर्मात्यांना नक्कीच मोठा झटका हा बसलाय.

प्रभास हा आदिपुरुष चित्रपटामध्ये भगवान राम यांच्या भूमिकेत होता तर क्रिती सनॉन ही माता सीतेच्या भूमिकेत. बाॅलिवूड अभिनेता सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत होता. अनेकांनी क्रिती सनॉन हिला देखील चित्रपटातील तिच्या लूकमध्ये टार्गेट केले होते. क्रिती सनॉन ही लोकांच्या निशाण्यावर आली होती.

Kriti Sanon

क्रिती सनॉन हिने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना मोठा धक्का बसलाय. क्रिती सनॉन हिने शेअर केलेला हा व्हिडीओ जीममधील आहे. या व्हिडीओमध्ये खास व्यायाम करताना क्रिती सनॉन ही दिसत आहे. खांबाला लटकत एक वेगळ्या पध्दतीचा व्यायाम करताना क्रिती सनॉन ही दिसत आहे. आता क्रिती सनॉन हिने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

क्रिती सनॉन हिने हा व्हिडीओ शेअर करत म्हटले की, कुछ मंडे मोटिवेशन…हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आता क्रिती सनॉन हिची खिल्ली उडवल्याचे बघायला मिळत आहे. एकाने क्रिती सनॉन हिच्या या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, पाहा आता ही सीता. दुसऱ्याने म्हटले आता हिच्याकडे काहीच पर्याय नाहीये. काही दिवसांपूर्वी क्रिती सनॉन आणि प्रभास यांच्या अफेअरच्या चर्चा या सतत सुरू होत्या. इतकेच नाही तर काही दिवसांमध्ये यांचा साखरपुडा पार पडणार असल्याचे सांगितले जात होते.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.