Adipurush | वादादरम्यान क्रिती सनॉनची पोस्ट; मंदिरासमोर ओम राऊतच्या ‘गुडबाय किस’वरून हंगामा

बुधवारी सकाळी क्रिती सनॉन आणि ओम राऊत यांनी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन श्री व्यंकटेश्वर यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तिथून निघताना ओम राऊत यांनी क्रितीच्या गालावर हलका ‘किस’ केला. याच गुडबाय किसवरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे.

Adipurush | वादादरम्यान क्रिती सनॉनची पोस्ट; मंदिरासमोर ओम राऊतच्या 'गुडबाय किस'वरून हंगामा
Kriti SanonImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 8:34 AM

मुंबई : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. नुकतीच या चित्रपटाची टीम आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात दर्शनासाठी पोहोचली होती. याच मंदिराजवळ चित्रपटाचा अंतिम ट्रेलर लाँच करण्यात आला. मंगळवारी या ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमानंतर बुधवारी अभिनेत्री क्रिती सनॉन आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. मात्र दर्शन घेतल्यानंतरच्या एका व्हिडीओवरून सध्या नवीन वाद निर्माण झाला आहे. मंदिरासमोर एकमेकांचा निरोप घेताना ओम राऊत यांनी क्रितीच्या गालावर किस केलं. याच व्हिडीओवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. या सर्व वादानंतर आता क्रिती सनॉनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे.

क्रितीने आदिपुरुषच्या तिरुपती इथल्या कार्यक्रमातील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने चाहत्यांचे आभार मानले आहेत. ‘माझं हृदय सकारात्मकता, तिरुपतीची पवित्र आणि शक्तीशाली ऊर्जा आणि तुम्हा सर्वांच्या प्रेमाने भरलंय. माझ्या चेहऱ्यावर अजूनही हास्य तसंच आहे’, असं तिने लिहिलं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Kriti (@kritisanon)

नेमकं काय घडलं?

बुधवारी सकाळी क्रिती सनॉन आणि ओम राऊत यांनी तिरुपती बालाजी मंदिरात जाऊन श्री व्यंकटेश्वर यांचं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर तिथून निघताना ओम राऊत यांनी क्रितीच्या गालावर हलका ‘किस’ केला. याच गुडबाय किसवरून आता नवीन वाद निर्माण झाला आहे. ओम राऊत आणि क्रितीच्या या व्हिडीओवर भाजपचे प्रदेश सचिव रमेश नायडू नागोथू यांनी टिप्पणी केली. सार्वजनिक ठिकाणी विशेषकरून मंदिराजवळ अशा पद्धतीने जाहीर वागणुकीची गरज होती का, असा सवाल त्यांनी केला. ‘तिरुमलामधील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरासमोर अशा पद्धतीने किस करणे, मिठी मारणे हे अत्यंत अपमानास्पद आणि अस्वीकार्य आहे’, असं त्यांनी म्हटलंय. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केलं. तोपर्यंत त्यांच्या ट्विटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक ओम राऊत यांच्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. रामायणाची कथा एका नव्या अंदाजात या चित्रपटातून सांगण्यात येणार आहे. यामध्ये ‘बाहुबली’ स्टार प्रभासने राघव, क्रिती सनॉनने जानकी, सनी सिंगने लक्ष्मण, सैफ अली खानने लंकेश आणि देवदत्त नागेनं हनुमानाची भूमिका साकारली आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....