‘नवाजुद्दीनला म्हणायचे, चल ना सेक्स सीन..’; ‘सेक्रेड गेम्स’मधील त्या बोल्ड दृश्याबाबत अभिनेत्रीचा खुलासा

"तो सीन पूर्ण करण्यासाठी आम्हाला सात टेक घ्यावे लागले होते. सातव्या टेकपर्यंत मी विसरले होते की मी किती तासांपासून शूटिंग करत होते. मी जमिनीवर कोसळली आणि उठूच शकली नाही. मी पूर्णपणे थकले होते आणि रडत होती."

'नवाजुद्दीनला म्हणायचे, चल ना सेक्स सीन..'; 'सेक्रेड गेम्स'मधील त्या बोल्ड दृश्याबाबत अभिनेत्रीचा खुलासा
Kubbra SaitImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 3:43 PM

मुंबई : अभिनेत्री कुब्रा सैत याआधी तिच्या अनेक मुलाखतींमध्ये ‘सेक्रेड गेम्स’मधील इंटिमेट सीनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली आहे. त्या सीनच्या शूटिंगनंतर ती खूप रडली होती, याबद्दलही तिने सांगितलं होतं. ‘सेक्रेड गेम्स’ या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये तिने कुक्कूची भूमिका साकारली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कुब्राने सहअभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीसोबतचा मजेशीर किस्सा सांगितला आहे. नवाजुद्दीनचं कौतुक करत ती म्हणाली की, तो स्वभावाने खूप चांगला आहे. इतकंच नव्हे तर नवाजुद्दीन इतका लाजरा होता की त्याला पकडून सेक्स सीन करावं लागायचं, असंही ती म्हणाली.

सेक्स सीननंतर ढसाढसा रडली होती कुब्रा

‘सेक्रेड गेम्स’मधील कुब्रा आणि नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्यातील इंटिमेट सीन हा चर्चेचा विषय ठरला होता. अनुराग कश्यपने या सीरिजचं दिग्दर्शन केलं होतं. तर सैफ अली खान आणि राधिका आपटे यांच्याही मुख्य भूमिका होत्या. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या मुलाखतीत कुब्रा तिच्या सेक्स सीनविषयी म्हणाली, “तो सीन पहिल्याच दिवशी शूट झाला होता. त्या दिवसातील तो शेवटचा सीन होता. मला त्या सीनला पूर्ण करायचं होतं. तो सीन पूर्ण करण्यासाठी आम्हाला सात टेक घ्यावे लागले होते. सातव्या टेकपर्यंत मी विसरले होते की मी किती तासांपासून शूटिंग करत होते. मी जमिनीवर कोसळली आणि उठूच शकली नाही. मी पूर्णपणे थकले होते आणि रडत होती. नवाजुद्दीन आणि अनुराग कश्यपने मला उचललं आणि मिठी मारली. त्यावेळी मी हळूच कट असा आवाज ऐकला आणि सुटकेचा नि:श्वास सोडला.”

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Kubbra Sait (@kubbrasait)

इंटिमेट सीन करण्यापूर्वी नवाजुद्दीनची केली मस्करी

नवाजुद्दीनसोबत शूट करतानाचा अनुभव सांगताना ती पुढे म्हणाली, “एक व्यक्ती म्हणून तो खूपच चांगला आहे आणि सर्वोत्तम अभिनेतासुद्धा आहे. तो खूप लाजरा आहे. आम्हा दोघांचे खूप सीन्स एकत्र होते. माझ्या मते तो या पृथ्वीवरील सर्वांत लाजाळू अभिनेता आहे. त्याला पकडून पकडून सीन करावे लागायचे. मी त्याच्याजवळ जाऊन गालावर किस करायची आणि म्हणायची, चल ना सेक्स सीन करूयात.”

कुब्राने लिहिलेल्या एका पुस्तकात जवळच्याच एका व्यक्तीने तिचं लैंगिक शोषण केल्याचा खुलासा केला होता. कुब्रा त्यावेळी 17 वर्षांची होती. आपल्या कुटुंबीयांसोबत ती नियमितपणे बेंगळुरूतील एका रेस्टॉरंटमध्ये जायची. त्या रेस्टॉरंटचे मालक कुब्रा आणि तिचा भाऊ दानिश यांच्याशी खूप चांगले वागायचे. त्यांनी कुब्राच्या आईला आर्थिक मदतही केली होती. त्या मदतीनंतरच त्याने लैंगिक शोषणाला सुरुवात केल्याचं कुब्राने पुस्तकात लिहिलं होतं.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.