वेश्या व्यवसायावर तरुणीची स्टँडअप कॉमेडी; कुमार विश्वास भडकून म्हणाले ‘हेच एखाद्या मुलाने..’

सध्या सोशल मीडियावर एका तरुणीच्या स्टँडअप कॉमेडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती वेश्या व्यवसायाची खिल्ली उडवताना दिसतेय. यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत असतानाच कवी कुमार विश्वास हेसुद्धा तिच्यावर भडकले आहेत.

वेश्या व्यवसायावर तरुणीची स्टँडअप कॉमेडी; कुमार विश्वास भडकून म्हणाले 'हेच एखाद्या मुलाने..'
स्टँडअप कॉमेडियनने वेश्या व्यवसायाची उडवली खिल्लीImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 2:50 PM

नवी दिल्ली : 23 ऑक्टोबर 2023 | प्रसिद्ध कवी कुमार विश्वास नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांच्या कवितेला चांगला प्रतिसाद मिळतो. याव्यतिरिक्त ते सोशल मीडियावर सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडत असतात. नुकतंच त्यांनी एका ट्विटद्वारे महिला स्टँडअप कॉमेडियनला फटकारलं आहे. संबंधित कॉमेडियनने तिच्या एका परफॉर्मन्सदरम्यान वेश्या व्यवसायाची मस्करी केली. यावरून नेटकऱ्यांनीही तिला धारेवर धरलं आहे. तिच्या कॉमेडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

या व्हिडीओमध्ये कॉमेडियन वेश्या व्यवसायासारख्या गंभीर मुद्द्याची खिल्ली उडवताना दिसतेय. ‘वेश्यावृत्ती’ला कूल मानत ती त्याची तुलना इतर नोकरी-व्यवसायाशी करते. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तिच्यावर निशाणा साधला आहे, तर काहींना तिच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये कोणतीच चूक आढळून आली नाही.

हे सुद्धा वाचा

“मला वेश्या व्यवसाय हा अत्यंत कूल व्यवसाय वाटतो. मी हे सिद्ध करू शकते. त्या व्यवसायात अनुभवावरून कोणताच पक्षपात केला जात नाही. ज्यांना फ्रेशर्स पाहिजे असतात, ते ब्लॅकमध्ये कच्च्या कळ्या मागवत आहेत. वेश्या व्यवसाय हा एकमेव असा धंदा आहे जिथे सीईओपेक्षा जास्त इंटर्न कमावतो. त्यांना शेखांसोबत दुबई ट्रिपसुद्धा मिळतेय”, अशा शब्दांत ती वेश्या व्यवसायाची खिल्ली उडवताना दिसते.

कुमार विश्वास यांचं ट्विट

यावर आक्षेप घेत कुमार विश्वास यांनी ट्विटरवर लिहिलं, ‘खरंतर हे फक्त मूर्खपणाचं नाही तर अमानवी आणि क्रूरसुद्धा आहे. हा असंवेदनशील विनोद म्हणजे सतत संस्कारांची खिल्ली उडवणाऱ्या आणि अश्लील जोक्स करणाऱ्या आजकालच्या तथाकथिक स्टँडअप सादरीकरणाची फक्त एक झलक आहे. सुदैवाने हे नीच काम कोणत्याही पुरुष सादरकर्त्याने केलं नाही, अन्यथा सर्व आयोग जागे झाले असते. तिच्या विनोदांवर हसणाऱ्यांनाही लाज वाटली पाहिजे.’

250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.