‘लपता लेडीज’ फेम अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने का मागितला सॅनेटरी पॅड? मासिक पाळीबद्दल म्हणाली…
Pratibha Ranta: 'लपता लेडीज' फेम अभिनेत्रीने पहिल्या बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं मोठं सत्य, बॉयफ्रेंडने का मागितला सॅनेटरी पॅट? मासिक पाळीबद्दल अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य... अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असते चर्चेत...
Pratibha Ranta: दिग्दर्शिका किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडिज’ सिमाने ऑस्करच्या यादीत आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांनी सिनेमाचं कौतुक केलं. सिनेमातील कलाकारांना देखील एक वेगळी ओळख निर्माण करता आली. सिनेमात जया ही भूमिका साकारत अभिनेत्री प्रतिभा रांटा एका रात्रीत नॅशनल क्रश झाली. तेव्हापासून प्रतिभा हिच्या चाहत्यांची संख्या देखील वाढली. आता अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहे. शिवाय मासिक पाळी आणि बॉयफ्रेंडबद्दल देखील प्रतिभाने मोठा खुलासा केला आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, प्रतिभा हिने महिलांसंबंधीत समस्या आणि मासिक पाळीबद्दल मोठा खुलासा केला आहे. मुलांना देखील मासिक पाळबद्दल माहिती असायला हवं असं अभिनेत्री म्हणाली. शिवाय प्रतिभा हिने तिच्या खासगी आयुष्यातील एक किस्सा सांगितला जेव्हा अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने तिच्याकडून सॅनिटरी पॅड मागितला.
मासिक पाळीबद्दल प्रतिभा म्हणाली, ‘आमच्या शाळेत मासिक पाळीबद्दल उत्तमप्रकारे सांगण्यात आलं होतं. आमची फक्त मुलींची होती आणि माझा पहिला बॉयफ्रेंड मुलांच्या शाळेतील होता. मी त्याची पहिली मैत्रिण होती आणि तो माझा पहिला मित्र. मी डान्स क्लासमधून घरी जात असताना रस्त्यात तो मला भेटला. तेव्हा माझी मासिक पाळी सुरु होती.’
‘मी त्याला सांगितलं, माझी मासिक पाळी सुरु आहे. त्यामुळे चालू शकत नाही. मासिक पाळीबद्दल ऐकताच तो घाबरला. पहिल्यांदा त्याच्यासोबत कोणी मासिक पाळीबद्दल बोलत होतं. तो मला सर्वकाही बायोलॉजिकली समजावू लागला… किती दिवसांपर्यंत असतं अशा अनेक गोष्टी… मी त्याला म्हणाली मला सर्वकाही माहिती आहे…’
पुढे प्रतिभा म्हणाली, ‘गप्पांनंतर आमची मैत्री आणखी घट्ट झाली. तो मला म्हणाला मी कधी सॅनिटरी पॅड पाहिलेला नाही. तू मला दाखवशील का? तेव्हा माझ्या बॅगेत असलेला एक्स्ट्रा सॅनिटरी पॅड मी काढला आणि त्याला दाखवला. यावर प्रतिभा म्हणाली काही गोष्टी अनुभवातून कळतात. त्यामुळे मासिक पाळीबद्दल मुलांना माहिती असणं गरजेचं आहे…
अभिनयाच्या प्रवासाबद्दल प्रतिभा म्हणाली…
‘मी अशा कुटुंबात वाढली आहे जेथे मुली, महिला स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतात. माझी आजी शिक्षिका होती, जेव्हा महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी देखील नव्हती. माझी आजी हिंदी विषय शिकवायची. तिला डान्स करायला देखील आवडायचं… माझी आई गृहिणी होती आणि ती तिचा स्वतःचा व्यवसाय आहे…’ अशी माहिती प्रतिभाने तिच्या कुटुंबातील महिलांबद्दल दिली.