Sushmita Sen : ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचं लग्न?, मालदीवमध्ये पार पडला विवाह सोहळा?

आयपीएल किंग ललीत मोदी आणि अभिनेत्री सुष्मिता सेन यांनी आज मालदीवमध्ये विवाह केला आहे. या लग्नसोहळ्याची सध्या जोरदार चर्चा आहे.

Sushmita Sen : ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचं लग्न?, मालदीवमध्ये पार पडला विवाह सोहळा?
Sushmita Sen: 'गोल्ड डिगर', 'लोभी' म्हणणाऱ्यांना सुष्मिताने सुनावलंImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 9:42 AM

मालदीव – आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि त्यानंतर फरार झालेले ललित मोदी (Lalit Modi) यांनी माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन (Sushmita Sen) हिच्याशी लग्न केले असल्याच्या बातम्या आल्या. दोघांनी मालदिवमध्ये (Maldiv) लग्न केले, अशाही चर्चा सुरु झाल्या. नुकतीच सुष्मिता सेन लग्नाच्या कॉमेंटमुळे चर्चेत आली होती. सुष्मिता सेन रिलेशनशीपमध्ये होती, मात्र तिने आत्तापर्यंत स्वताला लग्नाच्या बंधनात अडकून घेतले नव्हते. तीन वेळा रिलेशनशीपमध्ये असूनही सुष्मिता सेन लग्नाच्या निर्णायपर्यंत पोहचली नव्हती. सुष्मिता सेनचे वय 46 वर्ष आहे. मात्र आम्ही सध्या डेट करतोय एवढीच माहिती सुष्मिता सेन हीच्याकडून देण्यात आली आहे. सर्वात आधी ललित मोदी यांनी पहिलं ट्विट केलं त्यावेळी लग्न केल्या अशाच बातम्या आल्या. मात्र काही वेळातच त्यांनी स्पष्टीकारणही दिलं.

ललीत मोदी यांचं 40 मिनिटांपूर्वी ट्विट

ललीत मोदी यांचं सहा मिनिटांपूर्वीचं ट्विट

काही दिवसांपूर्वीच सुष्मिताचा ब्रेकअप

सुष्मिता ही एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री राहिली आहे. काही दिवसांपासूर्वीच सुष्मिताचे रोहमनसोबत ब्रेकअप झाले होते. सुष्मिता आणि रोहमन 2018 सालापासून एकमेकांना डेट करू लागले होते. दोघेही एकमेकांना वैयक्तिक आणि व्यावसायिक आधार देत असत. रोहमन सुष्मिताच्या मुली आणि तिच्या कुटुंबाच्याही खूप जवळचा होता. तो हिच्यापेक्षा वयाने लहान होता दोघांमध्ये 15 वर्षांचे अंतर होते.

ललित मोदी यांचे वादग्रस्त आयुष्य

ललित मोदी यांनी देशात आयपीएलची सुरुवात केली होती. त्यांनी त्यांच्या कुटुंबीताल अनेकांना आयपीएलमध्ये पार्टनरशीपही दिली होती. त्यांनी केलेल्या कामाचा फायदा त्यांच्या नीकटवर्तीयांनाच मिळाल्याचा आक्षेप आहे. 2008 साली आय़पीएल आल्यानंतर त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली आणि त्याचे श्रेयही ललित मोदींच्या पदरात पडले. 2005 ते 2010 त्यांच्याकडे बीसीसीआयच्या अपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. 2008 ते 2010 या काळात त्यांच्याकडे आयपीएलचा कार्यभार होता. ते आयपीएलचे अध्यक्ष आणि कमिश्नर होते. 2010 साली घोटाळ्याच्या आरोपावरुन त्यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली. त्यांना बीसीसीआयने सस्पेंडही केले. पैशांच्या अफरातफरीच्या आरोपानंतर 2010 साली ललित मोदी देशातून फरार झाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.