Lata Mangeshkar Nidhan : लतादिदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात: रश्मी ठाकरे

| Updated on: Feb 10, 2022 | 10:47 AM

Lata Mangeshkar Nidhan : गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांनी 8.12 वाजता अखेरचा श्वास घेतला.

Lata Mangeshkar Nidhan : लतादिदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात: रश्मी ठाकरे
लता मंगेशकर

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांनी 8.12 वाजता अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. कोरोना आणि न्यूमोनिया झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 28 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी  रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना सुरु आहेत. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. लता मंगेशकर या कोरोना आणि न्यूमोनियातून मुक्त झाल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Feb 2022 02:00 PM (IST)

    टीम इंडियाकडून लता मंगेशकर यांना आदरांजली

    टीम इंडियाकडून लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यात आली.  काळी पट्टी बांधून टीम इंडियाच्या खेळाडूंनी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहिली.

  • 06 Feb 2022 01:45 PM (IST)

    अनुपम खेर, जावेद अख्तर लतादीदींच्या निवासस्थानी प्रभुकुंज येथे दाखल

    पाहा व्हिडीओ

  • 06 Feb 2022 01:38 PM (IST)

    लता मंगेशकर यांच्यामुळं जगाची भारताकडे पाहण्याची दृष्टी बदलली: नरेंद्र मोदी

    लता मंगेशकर यांनी भारताची जी ओळख बनवली, भारतीय संगिताला जो स्वर दिला, त्यामुळे जगाला भारताकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाली. जगात लता मंगेशकर यांचे चाहते सर्वत्र पाहायला मिळतात. लता मंगेशकर स्वर आणि गाण्याच्या माध्यमातून आपल्यासोबत असतील. जड अंतकरणानं मी लता मंगेशकर यांना आदरांजली वाहतो.

  • 06 Feb 2022 01:19 PM (IST)

    भारतरत्न लता मंगेशकर यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाहिली काव्यमय श्रद्धांजली

    दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वाहिली काव्यमय श्रद्धांजली

    भारतरत्न लता मंगेशकर नाव हे राहील अजरामर मनामनात गुंजत राहिल गाणकोकिळेचे  सुमधुर स्वर लतादीदींचा स्मृतिगंध दरवळत राहील भारतभर जगभर

    लतादीदींचा आवाज त्यांची ओळख होती दुःखावर औषध म्हणून त्यांच्या गायनाची गरज होती गरिबांच्या दुःखावर मायेची फुंकर होती त्यांच्या  गायनाने सैनिकांनाही  प्रेरणा लाभत होती ए मेरे वतन के लोगो  जरा आखो मे भरलो पानी या गीतातून सदैव ऐकत राहू लतादीदींची वाणी गाणं कोकिळा स्वरसम्राज्ञी अजरामर ठरली मी वाहतो लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली!

    दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली!

    रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

  • 06 Feb 2022 01:10 PM (IST)

    खऱ्या अर्थाने संगीताची दुनिया पोरकी झाली : राहुल देशपांडे 

    खऱ्या अर्थाने संगीताची दुनिया पोरकी झाली

    काही गोष्टी अटळ असतात, आपल्या प्रत्येकाच्या बाबतीत ही घटना घडणार असली तरी आजचा दिवस येऊ नये असं वाटत होतं

    एकलव्य जसा दोर्णाचार्याकडे शिकला तसचं माझ्या सारखे अनेक जण त्यांचं गाणं पाहून शिकले

    असंख्य आठवणी आहेत

    त्यांची प्रेमाची कौतुकाची थाप विसरु शकणार नाही

    हा दिवस बघायला लागायला नको होता

  • 06 Feb 2022 12:53 PM (IST)

    लतादिदींच्या जाण्यामुळे भारताचे वैभव हरपले…अण्णा हजारे

    लतादिदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले आहे. अशी गायिका पुन्हा होईल असे वाटत नाही. गाणारे लोक अनेक आहेत पण लतादिदींसारखा आवाज, गाण्यातील भाव आणि संदेश हे दुर्मिळ आहे. भारतातील सर्व भाषांमधून गाणी गाणाऱ्या त्या एकमेव गायिका असाव्यात. त्यांनी गायिलेली भक्तीगीते, भावगीते व देशभक्तीपर गीते ही सामान्य माणसांना आनंद आणि प्रेरणा देणारी होती. वेगवेगळ्या क्षेत्रात कष्ट करणाऱ्या श्रमिकांनी थकल्यानंतर लतादिदींचे गाणे ऐकले किंवा त्यांचा आवाज कानावर पडला की, क्षणात श्रमपरिहार होत असे.

    लतादिदींचा आणि माझा अनेक वेळा भेटण्याचा प्रसंग आला. त्यांच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता. पद्मश्री व पद्मभूषण पुरस्कार मिळाला तेव्हाही एवढा आनंद झाला नसेल. त्यांनी गायिलेले ‘ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहिद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी’ हे गीत विसरणे कदापि शक्य नाही. हे गीत ऐकताना पंतप्रधानांच्या आणि उपस्थितांच्याही डोळ्यात पाणी आले होते. आजही ते गीत ऐकताना डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत. हे गाणे ऐकून लाखो लोकांच्या मनात देशभक्तीची प्रेरणा जागृत होते.

    भगवतगीतेत श्रीकृष्णाने म्हटल्याप्रमाणे ‘अंतःकाळी जो माझे नामस्मरण करतो त्याचा पवित्र आत्मा मलाच येऊन मिळतो’ याप्रमाणे लतादिदींना चिरशांती मिळालेलीच आहे यात शंका नाही. लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • 06 Feb 2022 12:26 PM (IST)

    लतादिदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात: रश्मी ठाकरे

    लतादिदींच्या जाण्यानं बाळासाहेबानंतरचा मोठा आघात- रश्मी ठाकरे

    मुंबई : लतादिदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठाआघात झाला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

    बाळासाहेब असतांना आणि नंतर देखील लतादिदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दिदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दिदी आज आपल्यात नाहीत, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • 06 Feb 2022 11:36 AM (IST)

    नरेंद्र मोदी लता मंगेशकर यांच्या अंत्यसस्काराला उपस्थित राहणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावणार आहेत. मुंबईत 4.30 वाजता ते पोहोचतील अशी माहिती आहे.

  • 06 Feb 2022 11:09 AM (IST)

    पुन्हा लता मंगेशकर होणं नाही हे त्रिवार सत्य : अजित पवार

    पुन्हा लता मंगेशकर होणं नाही हे त्रिवार सत्य : अजित पवार

    अजीब दास्ता है ये हे गाणं सर्वाधिक आवडतं

    अजित पवारांकडून आजचे सर्व कार्यक्रम रद्द

  • 06 Feb 2022 10:40 AM (IST)

    लता मंगेशकर यांचं गाणं चिरंजीव: अनुराधा पौडवाल

    लता मंगेशकर यांचं गाणं चिरंजीव आहे. त्या अजरामर आहेत. स्वरावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात त्यांचं स्थान आहे. लता मंगेशकर यांच्याशी अनेकदा भेट झाली होती.

  • 06 Feb 2022 10:36 AM (IST)

    स्वर युगाचा अंत झाला मातृतुल्य आशीर्वाद हरपला : उद्धव ठाकरे

    लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.

  • 06 Feb 2022 10:34 AM (IST)

    भारतीय संगीत क्षेत्राचा आत्म गमावला: देवेंद्र फडणवीस

    भारतीय संगीत क्षेत्राचा आत्म गमावला: देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

  • 06 Feb 2022 09:48 AM (IST)

    गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन, संगीत विश्वातील युग संपलं

    गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

  • 06 Feb 2022 09:37 AM (IST)

    रश्मी ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या

    रश्मी ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचल्या असून त्या लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची माहिती घेतील.

  • 06 Feb 2022 09:18 AM (IST)

    जनतेच्या आशीर्वादाने लतादीदी लवकर ब-या होतील : प्रविण दरेकर

    – देशासाठी लतादीदीची प्रकृती हा चिंतेचा विषय – जगाच्या पाठीवर लतादीदींनी देशाचे नाव मोठे केले आहे – मी देखील प्रार्थना करतो – लतादीदी या परमेशवरी अवतार आहेत – जनतेच्या आशीर्वादाने त्या लवकर ब-या होतील

  • 06 Feb 2022 09:09 AM (IST)

    लतादिदी लवकर बऱ्या व्हा, जगभरातून प्रार्थना

    गानसम्राज्ञी लतादिदी लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी जगभरातून प्रार्थना करण्यात येत आहे.  लता दिदी यांची प्रकृती अद्याप नाजूक असल्याची माहिती आहे.

  • 06 Feb 2022 09:06 AM (IST)

    लता मंगेशकर यांना भेटावं वाटतंय, ताई बऱ्या व्हाव्यात : सुरेश वाडकर

    लता मंगेशकर यांना भेटावं वाटतंय, ताई बऱ्या व्हाव्यात, अशी प्रार्थना करत असल्याचं सुरेश वाडकर यांनी म्हटलं. सुरेश वाडकर यांनी लतादिदी मला कायम त्यांच्या कुटुंबाचा भाग मानतात, असं म्हटलं.

  • 06 Feb 2022 08:52 AM (IST)

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचणार

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ब्रीच कँडी रुग्णालयात पोहोचणार आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची ते विचारपूस करणार आहेत.

  • 06 Feb 2022 08:21 AM (IST)

    ब्रीज कॅंडी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढला… रुग्णालयाला छावणीचं स्वरुप…

    ब्रीज कॅंडी परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढला… रुग्णालयाला छावणीचं स्वरुप…

    – आसपासच्या परिसरातील गाड्या ट्रॅफिक पोलिसांनी हटवून नो पार्किंग झोन तयार केला…

    केंद्रिय मंत्री नितीन गडकरी हे काही वेळात दाखल होणार असल्याने सुरक्षा व्यवस्था वाढली …

    बॉम्ब शोधक पथक रुग्णालयात दाखल,

  • 06 Feb 2022 08:20 AM (IST)

    Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर, उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती

    लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती डाक्टरांकडून मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  • 06 Feb 2022 06:56 AM (IST)

    ब्रिज कॅंडी परिसराला छावणीचं स्वरुप

    ब्रिज कॅंडी परिसराला छावणीचं स्वरुप…

    आसपासच्या परिसरातील गाड्या ट्रॅफिक पोलिसांनी हटवण्यास केली सुरवात..

  • 05 Feb 2022 04:29 PM (IST)

    मुंबई 

    मनसे अध्य राज ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयातून निघाले

  • 05 Feb 2022 03:00 PM (IST)

    Raj Thackeray : राज ठाकरे ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल

    Raj Thackeray : राज ठाकरे ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे रुग्णालयात पोहोचले आहेत. राज ठाकरे आणि लता मंगेशकर यांच्यातील संबंध जिव्हाळ्याचे राहिले आहेत.

  • 05 Feb 2022 02:38 PM (IST)

    लता मंगेशकर सध्या व्हेंटिलेटर सपोर्टवर,डॉ. प्रतीत समदानी यांची माहिती

    डॉ. प्रतीत समदानी यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. लता मंगेशकर यांना सध्या व्हेंटिलेटर सपोर्ट लावण्यात आला आहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. डॉक्टरांचं पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहे, अशी माहिती प्रतीत समदानी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली आहे. एएनआयनं यासंदर्भात ट्विट केलं आहे.

    एएनआयचं ट्विट

Published On - Feb 05,2022 2:36 PM

Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.