VIDEO:’अखरेचा हा तुला दंडवत’ व्हिडिओ व्हायरल,अखरेचा व्हिडिओ असल्याचा नेटिझन्सचा दावा

सध्या लतादीदींच्या मृत्यूनंतर काही तासातच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो गोदातीर समाचारने शेअर केला आहे. अखरेचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव या गाण्याच्या या व्हिडिओमध्ये लतादीदींना दोन महिला त्यांच्या हाताला धरून चालवत घेऊन जात असल्याचे त्यामध्ये दिसत आहे.

VIDEO:'अखरेचा हा तुला दंडवत' व्हिडिओ व्हायरल,अखरेचा  व्हिडिओ असल्याचा नेटिझन्सचा दावा
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 9:29 PM

मुंबईः भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाल्यानंतर सोशल मीडियावरून अनेक जणांनी वेगवगेळ्या पद्धतीने त्यांना आदरांजली वाहिली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या बालपणापासून ते अगदी त्या आजाराने त्रस्त असतानापर्यंतचे व्हिडओ (Video) , फोटो (Post) मोठ्या प्रमाणात व्हायरल (Viral) झाले. सध्या लतादीदींच्या मृत्यूनंतर काही तासातच त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो गोदातीर समाचारने शेअर केला आहे. अखरेचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव या गाण्याच्या या व्हिडिओमध्ये लतादीदींना दोन महिला त्यांच्या हाताला धरून चालवत घेऊन जात असल्याचे त्यामध्ये दिसत आहे. लता मंगेशकर यांचा हा अखरेचा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ लतादीदींच्या आजरापणातील असून तो रुग्णालयातील व्हिडीओ असल्याचं गोदातीर समाचारानं म्हटले आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची रुग्णालयात त्यांची प्रकृती खालवल्यापासून त्यांच्या चाहत्यांनी त्यांची तब्बेत सुधारावी म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यासाठी प्रार्थना केली. रविवारी सकाळी ब्रिच कँडी रुग्णालयाने त्यांच्या निधनाचे वृत्त दिल्यानंतर सांस्कृतिक क्षेत्रासह परदेशातील अनेक मान्यवरांनी आणि विदेशातील महत्वाच्या उच्च पदस्थ लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र यांनीही लतादीदी यांच्य निधनानंतर त्यांचे अंतिम दर्शन घेतले. व्हायरल झालेल्या व्हिडिओसारखाच नरेंद्र मोदी यांनी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसाला फोनवरून त्यांना शुभेच्छा दिल्या तो ऑडिओ कॉलही प्रचंड व्हायरल झाला आहे.

भारतरत्न पुरस्कारानंतरची शरद पवारांनी दिलेली मेजवाणी

सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांना त्यांच्या निधनामुळे दुःख झाले आहे. वेगवेगळ्या पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या बालपणीतील फोटो, त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टमधील त्यांचे काही व्हिडिओ, लतादीदींना भारतरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर शरद पवार ज्यावेळी दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्रा असताना त्यांनी मेजवाणी दिली त्या प्रसंगाचा फोटो आणि पोस्ट दोन्ही ही प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे. टीव्ही वरील गायनाच्या कार्यक्रमातील त्यांची उपस्थिती असतानाचेही काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत.

सोडून जाते गाव

सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो व्हिडिओही त्यांच्या आजरपणातील व रुग्णलयातील अखेरचा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. लता मंगेशकर यांना चालवत घेऊन जात असतानाचा आणि त्या व्हिडिओला ‘अखेरचा हा तुला दंडवत’ हे गीत सुरू असल्यामुळे अनेक चाहत्यांनी तो विविध पद्धतीने शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

संबंधित बातम्या

ती इस्लामिक परंपरा माहितीय का, ज्यावरुन शाहरुख खान वादात सापडलाय? लता दिदींसाठीची ती ‘फुंकर’ नेमकी काय आहे?

शाहरुख थुंकला की फुंकर ? मोदींचा फोटो ट्विट करत ऊर्मिला मार्तोंडकर म्हणतात, सबको सन्मती दे भगवान !

Fact Check: ‘त्या’ फोटोत शाहरुखची बायको नाही? मग ती कोण? ‘आयडीया ऑफ इंडियाच्या’? फोटोचं वास्तव काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.