Lata Mangeshkar Passed Away : लतादिदी अनंतात विलीन, पंतप्रधान मोदींनी लतादिदी यांना आदरांजली वाहिली, दिग्गजांची उपस्थिती

| Updated on: Feb 06, 2022 | 10:07 PM

Lata Mangeshkar Health Update : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली होती. लता मंगेशकर या गेल्या कोरोना आणि न्यूमोनियातून मुक्त झाल्या होत्या. त्यानंतर त्यांचा व्हेंटिलेटर सपोर्ट हटवण्यात आला होता. पुन्हा प्रकृती ढासळल्यानं त्यांना व्हेंटिलेटर सपोर्ट लावण्यात आला होता.

Lata Mangeshkar Passed Away : लतादिदी अनंतात विलीन, पंतप्रधान मोदींनी लतादिदी यांना आदरांजली वाहिली, दिग्गजांची उपस्थिती
लतादिदींंना अखेरचा निरोप

मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं आज सकाळी 8.12 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोना आणि न्यूमोनिया झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 28 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी (Breach Candy Hospital) रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लतादिदींची प्रकृती पुन्हा बिघडली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. लता मंगेशकर यांच्या प्रकृतीसाठी देशभरातून प्रार्थना सुरु आहेत. डॉक्टरांच्या विशेष टीमच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. डॉ. प्रतीत समदानी (Dr. Pratit Samdani) यांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली होती. लता मंगेशकर या कोरोना आणि न्यूमोनियातून मुक्त झाल्याची माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Feb 2022 08:57 PM (IST)

    संजय राऊत यांची उद्या होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे

    सुभाष देसाई यांचीही उद्याची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे.

    संजय राऊत उद्या सायंकाळी दिल्लीत जातील.

  • 06 Feb 2022 08:54 PM (IST)

    दिदींना आदरांजली

     

  • 06 Feb 2022 07:36 PM (IST)

    देश पोरका झाला

  • 06 Feb 2022 07:21 PM (IST)

    दिदींंना दिला अखेरचा निरोप

    लतादिदी अनंतात विलीन

    छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये झाले अंत्यसंस्कार

    मोदींनी विहीली आदरांजली

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपालही होते उपस्थित

    बॉलिवूडमधील  दिग्गजांचीही उपस्थिती

  • 06 Feb 2022 07:06 PM (IST)

    लतादिदींना भावपूर्ण निरोप

  • 06 Feb 2022 07:05 PM (IST)

    सचिन तेंंडुलकर यांनी वाहिली आदरांजली

  • 06 Feb 2022 06:58 PM (IST)

    लतादिदींंना श्रद्धांजली

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे , पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर,आमदार सुनील प्रभू आदींनी देखील लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.

  • 06 Feb 2022 06:50 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी पार्क येथे उपस्थित राहून लतादीदींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले

  • 06 Feb 2022 06:38 PM (IST)

    लता दिदींसाठी शाहरुखनं नमाज केली अदा

    लतादिदींना शाहरुख खानने श्रद्धांजली वाहिली

  • 06 Feb 2022 06:32 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरेंनी पुष्पचक्र केलं अर्पण

    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते मात्र मुख्यमंत्र्यांना बघताचं फडणवीस उठले आणि मुख्यमंत्र्यांना मोदींशेजारी जागा दिली

    पंतप्रधान मोदी आदरांजली वाहून निघाले

  • 06 Feb 2022 06:22 PM (IST)

    नरेंद्र मोदींनी वाहिली आदरांजली

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पोहोचले

  • 06 Feb 2022 06:19 PM (IST)

    पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचले तेव्हाचे फोटो

  • 06 Feb 2022 06:11 PM (IST)

    छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर लतादीदींवर अंत्यसंस्कार, पाहा व्हिडिओ

  • 06 Feb 2022 05:51 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मैदानात पोहोचले

    राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे हे पोहोचले

    रश्मी ठाकरे, सचिन तेंडुलकर, मुलगा आणि पत्नी पोहोचले

  • 06 Feb 2022 05:47 PM (IST)

    शरद पवार, सुप्रिया सुळे दाखल

    उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे अंत्यदर्शनासाठी पोहोचत आहेत

  • 06 Feb 2022 05:43 PM (IST)

    मोदी मुंबईत दाखल

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा मुंबई विमानतळावरुन निघाला

  • 06 Feb 2022 05:41 PM (IST)

    शाहरूख खान दिदींना निरोप देण्यासाठी आला

    दीदींच्या अखेरचा प्रवास

    पार्थिव  पार्कमध्ये पोहोचले

    संध्याकाळी साडे सहाला अंत्यसंस्कार

    अंत्यविधीला पीएम मोदी उपस्थित राहणार

  • 06 Feb 2022 05:33 PM (IST)

    एक भारतरत्न दुसऱ्या भारतरत्नाला निरोप देण्यासाठी दाखल

    सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी दाखल

  • 06 Feb 2022 05:26 PM (IST)

    लतादिदींना निरोप देण्यासाठी लोक जमले

    सर्वसामान्य नागरिक रांगेत शिवाजी पार्क मैदानात सोडायला सुरुवात

  • 06 Feb 2022 05:22 PM (IST)

    प्रभादेवी परिसरात पार्थिव पोहचले

    10 मिनिटात छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये पार्थिव पोहचणार

  • 06 Feb 2022 05:14 PM (IST)

    अंत्यसंस्काराची तयारी अंतिम टप्प्यात

    अंत्यसंस्काराची जागा फुलांनी सजवली

    तिन्ही दलाचे जवान मानवंदना देण्यासाठी मैदानात हजर

  • 06 Feb 2022 05:08 PM (IST)

    नारायण राणे यांच्याकडून दिदींंना श्रद्धांजली

  • 06 Feb 2022 04:40 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा थोड्याच वेळात मुंबई विमानतळावरुन निघणार

    राज्यपाल मुबंई विमानतळावर दाखल

    मुख्यमंत्री सायंकाळी 5.15 वाजता अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क येथे पोहचत आहेत

  • 06 Feb 2022 03:49 PM (IST)

    लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

    मुंबई : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

  • 06 Feb 2022 03:35 PM (IST)

    पंतप्रधान मोदी मुंबईला रवाना

    विशेष विमानाने पोहचणार

    छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त

    मिनाताई ठाकरे स्मृती मार्गापासून पार्कपर्यंत जाणारा रस्ता बंद

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 वाजता शिवाजी पार्कवर दाखल होणार

    व्हीव्हीआयपी व्यक्ती दाखल होणार असल्याने विशेष खबरदारी

  • 06 Feb 2022 03:02 PM (IST)

    नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला रवाना होणार

    सव्वातीन वाजता पंतप्रधान मोदी रवाना होणार

    5:45 वाजता पंतप्रधान मोदी शिवाजी पार्कवर पोहोचणार

    सव्वा 6 वाजता होणाऱ्या अंत्यसंस्कारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्कवर उपस्थित राहणार

    विशेष विमानाने नवी दिल्लीतून काही वेळात पंतप्रधान मोदी मुंबईला रवाना होणार

  • 06 Feb 2022 02:54 PM (IST)

    पंतप्रधान मोदींचं ट्विट

  • 06 Feb 2022 02:11 PM (IST)

    भारतीय संगीत क्षेत्र नाही तर विश्वातील संगीत क्षेत्राचं नुकसान : विक्रम गोखले

    भारतीय संगीत क्षेत्र नाही तर विश्वातील संगीत क्षेत्राचं नुकसान

    ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले भावूक

    अंत्यदर्शनाला जाऊ शकत नाही हे दुर्भाग्य

    हे नुकसान कधीही न भरून येणार

    लतादीदी अजरामर आहेत, शतकानुशतके जोपर्यंत जगात संगीत आहे  तोपर्यंत लतादीदींना कुणीही विसरु शकणार नाही

    गेल्या दीड दोन महिन्यांपूर्वी आजारी होतो, त्यावेळी लता मंगेशकर यांचा दोन दोन दिवसानंतर फोन यायचा, त्या विचारपूस करायच्या

  • 06 Feb 2022 01:51 PM (IST)

    लता मंगेशकर यांच्या जाण्याने भारत देशा बरोबर सर्व विश्वाला दुःख : राजेश टोपे

    लता मंगेशकर यांच्या जाण्याने भारत देशा बरोबर सर्व विश्वाला दुःख झाले आहे. लता मंगेशकर आज जरी आपल्यामध्ये नसल्या तरी त्या स्वरांच्या माध्यमातून आपल्या आठवणीत राहतील. लता दिदींच्या जाण्याने सर्व देश हळ हळ व्यक्त करत असल्याच्या भावना व्यक्त करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लता दिदींना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

  • 06 Feb 2022 01:48 PM (IST)

    मंत्रालयावरील ध्वज अर्ध्यावर आणण्यात आला

    लता मंगेशकर यांच्या निधनामुळं दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निधनामुळं मंत्रालयावरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला आहे.

  • 06 Feb 2022 01:16 PM (IST)

    भारताने टॉस जिंकला

    भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरेल.

  • 06 Feb 2022 12:53 PM (IST)

    Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांचं पार्थिव प्रभुकुंज निवासस्थानी रवाना

    Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांचं पार्थिव प्रभुकुंज निवासस्थानी नेण्यात येत आहे. पेडर रोडवरील लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल.

  • 06 Feb 2022 12:42 PM (IST)

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोडयाच वेळात ‘प्रभुकुंज’ जाणार

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे थोडया वेळात ‘प्रभुकुंज’ जाणार.

    सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज मैदानातही जाण्याची दाट शक्यता

    शरद पवार सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जाणार

  • 06 Feb 2022 12:25 PM (IST)

    ब्रीच कँडी रुग्णालयातून लता मंगेशकर यांचं पार्थिव निवसास्थानी नेणार

    ब्रीच कँडी रुग्णालयातून लता मंगेशकर यांचं पार्थिव निवसास्थानी नेण्यात येणार आहेत. ब्रीच कँडी रुग्णालयातून पार्थिव रुग्णवाहिकेतून पेडररोडवरील प्रभुकुंज येथील निवासस्थानी नेण्यात येईल.

  • 06 Feb 2022 12:06 PM (IST)

    आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवाजी पार्कवरील तयारीचा आढावा

    आदित्य ठाकरे यांच्याकडून शिवाजी पार्कवरील तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. ते शिवाजी पार्कवरील महापालिकेकडून सुरु असलेल्या कामाचा आढावा घेत आहेत. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील हे त्यांना माहिती देत आहेत.

  • 06 Feb 2022 12:01 PM (IST)

    लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये अंत्यसंस्कार, महापालिकेची तयारी सुरु

    भारतरत्न लता मंगेशकर यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्क मैदानात तीन तास ठेवण्यात येणार आहे

    त्यानंतर विद्युत दाहिनीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

    स्वर्गीय भारतरत्न लता मंगेशकर यांना राजकीय सन्मानाने त्यांना मुंबई पोलीस दलात मार्फत तसेच भारतीय लष्करा कडून शासकीय इंतमामान सलामी देण्यात येणार त्यामध्ये वीस पोलीस कर्मचारी सामील होतील 5 अधिकारी 2 बिगलुर तसेच 3 राऊंड हवेत फायर केले जाणार आहे

  • 06 Feb 2022 11:35 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थिती लावणार आहेत. मुंबईत 4.30 वाजता ते पोहोचतील अशी माहिती आहे.

  • 06 Feb 2022 11:20 AM (IST)

    राज ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयात थोड्याच वेळात दाखल होणार

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ब्रीच कँडी रुग्णालयाकडे  रवाना झाले आहेत. राज ठाकरे यांनी काल रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची विचारणा केली होती.

  • 06 Feb 2022 11:17 AM (IST)

    लतादिदी यांचं पार्थिव 12.30 ते 3 पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार

    लता मंगेशकर यांचं पार्थिव 12.15 वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांच्या निवासस्थानी नेण्यासाठी बाहेर नेण्यात येईल. 12.30 ते 3 पर्यंत  त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. लतादिदींवर मुंबईतल्या शिवाजीपार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.

  • 06 Feb 2022 11:14 AM (IST)

    लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील,मनात देखील!! : पंकजा मुंडे

    प्रत्येक स्वर ऐकणार्‍या, गाणार्‍या,गुणगुणणा-यांनाच नव्हे तर अगदी आसमंतातील स्वरांच्या अणू-रेणूंना ही प्रभावित करणारा तो मंजुळ पवित्र आवाज,सोज्वळ भाव, जरीकाठी साड़ी,अंगभर पदर,लोभस हसरा चेहरा काळाआड गेला तरी नजरेआड जात नाही”आदरांजली” लता दीदी नेहमी सुरात कोरल्या राहतील,मनात देखील!!

  • 06 Feb 2022 11:07 AM (IST)

    लता मंगेशकर या भारतीय आणि जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न : अजित पवार

    महाराष्ट्राच्या मातीला संगीत कलेचा वारसा

    लतादिदींनी भारतीय संगीत क्षेत्रात जो चमत्कार घडवला तो 75 ते 80 वर्ष अनेक पिढ्यांनी पाहिला

    आज दु:खद बातमी आपल्याला समजली

    लता मंगेशकर या भारतीय आणि जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न

    28 स्वरांच्या दुनियेत त्यांनी संगीताचे अविष्कार घडवले

    22 भाषांमध्ये त्यांनी गायन केले

    अद्वितीय ओळख त्यांनी निर्माण केली

    1962 च्या चीनच्या  युद्धातील जवानांना आदरांजली देताना ऐ मेरे वतन के लोगो हे गाणं गायलं त्यावेळी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांना देखील  अश्रू अनावर झाले होते

    आम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहोत

    मुख्यमंत्र्यांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिलेत

  • 06 Feb 2022 10:49 AM (IST)

    लता मंगेशकर यांच्या निधनानं भारतीय कलाविश्वाचं कधीही भरुन न येणार नुकसान : प्रियांका गांधी

    प्रियांका गांधी यांच्याकडून ट्विटद्वारे आदरांजली

  • 06 Feb 2022 10:46 AM (IST)

    लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात : उद्धव ठाकरे

    लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

    मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.

    ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.

    लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?

  • 06 Feb 2022 10:44 AM (IST)

    लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसस्कार 

    लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसस्कार करण्यात येणार आहेत. लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन 4 ते 6  दरम्यानासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे.

  • 06 Feb 2022 10:42 AM (IST)

    लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसस्कार 

    लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसस्कार

    4 ते 6 वाजेदरम्यान अंत्यदर्शन

    साडे सहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

  • 06 Feb 2022 10:35 AM (IST)

    लतादीदींच्या निधनानं संगीतविश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न भंगलं :उपमुख्यमंत्री अजित पवार

    “‘अजीब दास्ताँ है ये…. कहाँ शुरु कहाँ खतम, ये मंजिलें हैं कौनसी…? ना वो समझ सके, ना हम…’ सारख्या हजारो सूमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादीदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादीदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादीदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादीदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादीदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही… अशा लतादीदी आता पुन्हा होणे नाही…” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

    “लतादीदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संगीतकलेचा गौरवशाली वारसा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादीदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादीदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. संगीतक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवलं. ‘अद्वितीय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारतीय, जागतिक संगीतक्षेत्र समृद्ध केलं. देव आणि स्वर्ग आहेत की नाही ते माहित नाही, परंतु लतादीदींमध्ये अनेकांनी देव पाहिला. त्यांच्या सूरांनी रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभूती दिली. लतादीदींनी सामाजिक बांधिलकीही जाणीवपूर्वक जपली.

    1962 च्या चीनविरुद्धच्या युद्धात शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेल्या ‘मेरे वतन के लोगो…’ गाण्यानं तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पंडित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. विश्वरत्न, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लतादीदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचं निधन ही महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी आहे. लतादीदींचं नसणं कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. मी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबियांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • 06 Feb 2022 10:27 AM (IST)

    आज जीवन पोरकं झाल्यासारखं वाटत : राहुल देशपांडे

    आज जीवन पोरकं झाल्यासारखं वाटत, पांडुरंगाला विठू माऊली म्हणतो तसं लता मंगेशकर या आमच्यासाठी स्वरमाऊली होत्या  : राहुल देशपांडे

  • 06 Feb 2022 10:26 AM (IST)

    असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपला : सुधीर मुनगंटीवार

    स्वरसम्राज्ञी गानकोकिळा भारतरत्न लतादीदी यांच्या निधनाने भारतीयांसह जगातील असंख्य रसिक श्रोत्यांचे भावविश्व समृद्ध करणारा स्वर्गीय सूर हरपल्याची शोकभावना माज़ी अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

  • 06 Feb 2022 10:25 AM (IST)

    लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्कवर अंत्यंसस्कार होणार

    लता मंगेशकर नावाचं पर्व आज संपलं. त्यांच्या जाण्याने आज भारत पोरका झाला. मात्र त्यांचा आवाज कायम या जगात राहिल. दुपारी 12 वाजता त्यांचं पार्थिव त्यांच्या पेडर रोडवरच्या त्यांच्या घरात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल. लतादिदींवर मुंबईतल्या शिवाजीपार्कवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती आहे.

  • 06 Feb 2022 10:22 AM (IST)

    लता मंगेशकर यांच्या निधनानं पोकळी निर्माण झालीय : अमृता फडणवीस

    लता मंगेशकर यांच्या निधनानं पोकळी निर्माण झालीय : अमृता फडणवीस

    अमृता फडणवीस यांचं ट्विट

  • 06 Feb 2022 10:19 AM (IST)

    लतादीदी यांचं संगीत क्षेत्रातील योगदान शब्दात मांडणं कठिण : अमित शाह

    अमित शाह यांच्याकडून आदरांजली

  • 06 Feb 2022 10:14 AM (IST)

    आनंद मरते नही, लतादिदी यांचा स्वर ध्वनी लहरीत असतोच: कौशल इनामदार

    जी बातमी येऊ नये ती आली. कालपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. असंख्य गाण्यांच्या स्वरुपात त्या आपल्यात आहेत. गाण्यांच्या रुपात त्या आपल्यासोबत आहेत. लता मंगेशकरांची 70 ते 75 वर्षांची कारकीर्द होती. जगात एकही क्षण असा जात नाही. ध्वनी लहरीत त्यांचा आवाज सुरु असतो.

  • 06 Feb 2022 10:10 AM (IST)

    लता मंगेशकर यांचं युग 1940 पासून सुरु झालं, शब्दांना आपलं करुन त्या गायच्या: जावेद अख्तर

    लतादीदी यांच्या पूर्वी आणि त्यांच्यानंतर लता मंगेशकर यांच्यासारखं कोण होऊ शकेल, असं वाटत नाही. लता मंगेशकर यांचं युग 1940 पासून सुरु झालं होतं. ते आजही सुरु होतं. लता मंगेशकर यांनी संगीत क्षेत्रात केलेल्या कामासारखं काम दुसरं कोण करु शकत नाही.  माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीला मी संगीत क्षेत्रातील एका जाणकारांना विचारलं होतं. क्लासिकल आणि नॉन क्लासिकल सिंगर मानतात. लतादिदी या नेहमी सेंटरला गायच्या. लतादीदी जे गायच्या त्याच्या शब्दांची जाणीव होती. शब्दाची भावना समजून आपलं बनवून त्या गात होत्या.

  • 06 Feb 2022 10:06 AM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ट्विट करुन आदरांजली

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली

  • 06 Feb 2022 10:04 AM (IST)

    लतादीदींनी 8.12 वाजता घेतला अखेरचा श्वास

    आज सकाळी 8.12 वाजता लता मंगेशकर यांचं निधन झालं.

    मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळं त्यांचं निधन झालं

    कोरोना झाल्यानंतर उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर 28 दिवस उपचार सुरु होते.

  • 06 Feb 2022 10:02 AM (IST)

    जगाला मंत्रमुग्ध करणारा आवाज हरपला : एकनाथ खडसे

    जगाला मंत्रमुग्ध करणारा आवाज हरपला : एकनाथ खडसे

  • 06 Feb 2022 10:00 AM (IST)

    लता दीदी नावाच्या युगाचा अंत, प्रविण दरेकर यांची भावना

    – देशाच्या दृष्टीने अत्यंत दुखद घटना – लता दीदी नावाच्या युगाचा अंत – देशाची कधी भरून न निघणारी पोकळी – संगीत क्षेत्रातील मन सुन्न झाले

  • 06 Feb 2022 09:58 AM (IST)

    लतादीदींच्या निधनानं देशाची आणि संगीत क्षेत्राची मोठी हानी : नितीन गडकरी

    लतादीदी या संगीत युगाचा इतिहास होता. त्यांनी संगीताच्या माध्यमातून भारताचा नाव जगात पोहोचवलं. त्यांनी अनेक भाषांमध्ये गायन केलं. त्यांच्या निधनानं देशाची आणि संगीत क्षेत्राची हानी झाली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई, गोवा आणि संस्कृतीसाठी त्या जोडलेल्या होत्या. त्या आपल्यामध्ये नाहीत. पण, त्यांचं संगीत आणि त्यांनी गायलेली गाणी आपल्यासोबत असतील. त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो. त्या आमच्या देशाच्या अभिमान होत्या. संगीत आणि गायनाच्याद्वारे देशाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून दिला. त्यांनी 75 ते 80 व्या वर्षी आवाज दिला तरी तो 20 वर्षाच्या मुलीच्या आवाजासारखं त्यांचा आवाज वाटायचा. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी त्यांचा संबंध होता. लतादीदी यांचा आधार आम्हाला होता.

  • 06 Feb 2022 09:52 AM (IST)

    जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले : शरद पवार

    जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील, अशा शब्दात शरद पवार यांनी लतादीदींबद्दल भावना व्यक्त केल्या.

  • 06 Feb 2022 09:47 AM (IST)

    लतादीदींना जगातील आणि भारतातील माणूस विसरु शकणार नाही : अशोक सराफ

    भारताची शान निघून गेली. भारताचा आवाज गेला. कोणत्या शब्दात बोलू हे मला समजत नाही. दीदींना भारतातील आणि जगातील कोणताही माणूस विसरु शकत नाही, असं ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ म्हणाले.

  • 06 Feb 2022 09:45 AM (IST)

    लता मंगेशकर यांचं निधन

    गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं आहे. मुंबईतील (Mumbai) ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy) उपचार सुरु शनिवारपासून प्रकृती ढासळलल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. कोरोना आणि न्यूमोनिया झाल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Published On - Feb 06,2022 9:43 AM

Follow us
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.